Dr Neelam Gorhe
Dr Neelam Gorhe sakal
पिंपरी-चिंचवड

Chinchwad Kasaba Byelection : विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची नावे मागविली : डॉ. निलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा

चिंचवड व कसबा विधानसभा दोन्ही पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतून लढविण्याची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मानसिकता आहे.

पिंपरी - चिंचवड व कसबा विधानसभा दोन्ही पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतून लढविण्याची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मानसिकता आहे. या बैठकीत बैठकीत पदाधिकाऱ्यांचे म्हणने ऐकून पक्षाच्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहर प्रमुखांना इच्छुकांची यादी उद्या सायंकाळ पर्यंत संपर्क प्रमुखांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेनेच्या उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांची शुक्रवारी (ता. ३) वाकड येथे खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला डॉ. गोऱ्हे, माजी मंत्री शशिकांत सुतार, उपनेत्या सुषमा आंधारे, पुणे व पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख आमदार सचिन अहेर, आदित्य शिरोडकर, दिलीप घोडेकर, जिल्हा प्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदि उपस्थित होते.

बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. सचिन भोसले यांनी चिंचवडबद्दलचा अहवाल दिला. पुणे शहरप्रमुखांनी कसबा मतदारसंघाचा अहवाला दिला. पक्षाकडून इच्छुकांची नावे मागविण्यात आली आहेत. दोन्ही शहर प्रमुखांनी नावे मागवून उद्या शनिवारी (ता. ४) सायंकाळपर्यंत सचिन अहिर यांना पाठविण्यास सांगण्यात आले.

राष्ट्रवादीने एक तरी जागा सोडावी - सचिन अहिर

महाविकास आघाडी सर्वांसाठी बंधनकारक आहे. जशी आम्हाला त्यांची गरज आहे तशी त्यांनाही आमची गरज आहे. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व अजित पवार एकत्र बसून बोलले होते व ते बसून चर्चा करुन निर्णय घेतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठे मन दाखवून चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक तरी जागा सोडावी व त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. पुणे जिल्ह्यातून महाविकास आघाडी म्हणून पक्षाला काही तरी मिळावे व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहण्यासाठी आम्हाला निवडणूक लढविणे ही काळाची गरज आहे. पुणे जिल्ह्यात माजी आमदार विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर या सारखे यापुर्वी आमचे निवडून आलेले आहेत. तसा चमत्कार या मतदारसंघांमध्ये होवू शकतो. त्यामुळे शिवसेनेला एका जागेवर तरी संधी द्यावी, असे स्पष्ट मत संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

पदविधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बाजूने चांगला कौल पडलाय. यामध्ये शिवसेनेने आपली समांजस्याची भूमिका घेतली. शिवसेनेला कोणी गृहीत धरू नये. चर्चा शेवटच्या क्षणी केल्या जातात. मला कोणावर व्यक्तिगत रोख ठेवायचा नाही. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकांमध्ये आम्ही चित्र पाहिले आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेकांचे अनेक समझोते असतात. या पध्दतीच्या समझोत्यातून जनतेचे नुकसाण होऊ नये, याची काळजी आम्ही घेणार आहोत.

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपनेत्या, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

‘अजित पवार मोठे नेते; त्यांच्याबाबत भाष्य करणे योग्य नाही’

अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला घेणार व प्रचाराला सुरुवात करावी, असे आदेश काल गुरुवारी (ता. २) पक्षाच्या बैठकीत दिले होते. याबाबत पत्रकारांनी विचारले असता डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अजित पवार फार मोठे नेते आहेसत. त्यांनी कशाच्या चिन्हावर लढवायची काय सांगितले, यावर मी भाष्य करणे मला तर योग्य वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT