पिंपरी-चिंचवड

चिंचवड शिवसेना शाखा प्रमुखांच्या खुनाचे कारण उलगडले

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड, मोहननगर येथील शिवसेनेच्या शाखा प्रमुखाचा खून क्रिकेटवरील बेटिंगच्या पैशावरून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. विजय सर्जेराव सुर्वे (वय ४०, रा. चिंचवड) असे खून झालेल्या शिवसेनेच्या मोहननगर शाखाप्रमुखाचे नाव आहे. या प्रकरणी हर्षद अशोककुमार राठोड (वय २९, रा. निगडी) याला पोलिसांनी ११ मार्चला; तर त्याचा साथीदार महंमद इकलाख महंमद इद्रिस (वय ३३, रा. दिल्ली) याला १५ मार्चला अटक केली. विजय सुर्वे यांचा मृतदेह मुळशी खुर्द येथे सापडल्यानंतर सुरुवातीला याबाबत पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. 

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन व पिंपरी पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करून तपास केला. दरम्यान, पोलिसांनी हर्षद राठोड याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करून पोलिसांनी त्याचा साथीदार इद्रिस याला निगडीमधून अटक केली. दोघांकडे तपास केला असता विजय सुर्वे हे क्रिकेटवर बेटिंग घ्यायचे. त्यातून आरोपी हर्षद हा त्यांच्याकडे जाऊ लागला. त्याने बेटिंगवर लावण्यासाठी १८ ते २० लाख रुपये सुर्वे यांच्याकडून घेतले.

घेतलेले पैसे सुर्वे यांनी परत मागितले असता, आरोपी हर्षद आणि इद्रिस यांनी मिळून सुर्वे यांना जमीन दाखवण्याच्या बहाण्याने काळभोरनगर चिंचवड येथून मोटारीमधून ताथवडे येथे मोकळ्या जागेत नेले. तिथे सुर्वे यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द येथे टाकला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT