पिंपरी-चिंचवड

Video : थेरगावात अशुद्ध पाण्यामुळे घरोघरी आजारी; पाणीपुरवठा विभागावर नागरिक संतापले

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आधीच कोरोना, त्यात जलजन्य आजारांचा भरणा, अशी स्थिती पिंपरी चिंचवड शहरात निर्माण झाली आहे. शहराच्या बहुतांश भागांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने कावीळ, उलट्या, अतिसार व पोटदुखी असे अनेक रोगांची लागण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, पाणी शुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी थेरगाव-पडवळनगरमधील एकेका कुटुंबातील चार-पाच जण आजारी पडल्याने नागरिकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिसाराचे रुग्ण आढळून आल्याने शहरातील 42 ठिकाणाहून नागरिकांनी पाणीपुरवठा दूषित असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. थेरगाव - पडवळनगरमधील एकेका कुटुंबातील चार-पाच जण आजारी पडले आहेत. नागरिकांनी स्थानिक दवाखान्यात जाऊन तपासणी केल्यावर डॉक्‍टरांनीदेखील पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार व साथीचे रोग होत असल्याचे ऍड. सुषमा नामदास स्पष्ट सांगितले आहे. पिण्याचे पाणी कपड्याने गाळून घेतले, तरी ते दूषितच दिसत असल्याची तक्रार प्रमोद शिंदे व देवेंद्र नामदास यांनी केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरिता कांबळे म्हणाल्या, "इतकं गढूळ पाणी असते की प्यायला नको वाटते. आमच्या आळीत प्रत्येक घरातील एक -दोन जण पोटदुखी, अतिसाराने आजारी पडले आहेत. खासगी दवाखान्यातदेखील डॉक्‍टर घेत नाहीत.'' अजिंक्‍य चक्कर म्हणाले, "महापालिकेकडे वारंवार तक्रार केली आहे. परंतु, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली जात नाही.'' पावसाळी वातावरणात घरात गढूळ पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे विशाल बाबर या तरुणाने सांगितले. अशाप्रकारे शहरातील मोशी, चिखली, निगडी, भोसरी, दिघी, रुपीनगर, संभाजीनगर, बोपखेल, तळवडे, पिंपरी, संत तुकारामनगर, सांगवी, शाहूनगर या परिसरात नागरिकांना पाण्यातून बाधा झाली आहे. याच भागातील नागरिकांनी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी महापालिकेकडे धाव घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून शुद्ध पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT