पिंपरी-चिंचवड

Video : 'या' अफवेमुळे पिंपरी पोस्ट कार्यालयासमोर झाली गर्दी

आशा साळवी

पिंपरी : 'सरकारकडून जनधन योजनेअंतर्गत पैसे पोस्ट खात्यावर जमा झाले आहेत', ही अफवा पसरल्यामुळे पिंपरी रेल्वे स्टेशन येथील पोस्ट कार्यालयाच्या आवारात 'इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक' (आयपीपीबी) खाते उघडण्यासाठी खातेदारांनी आज (मंगळवार, ता. 19) मोठी गर्दी केली होती. 

टोकन क्रमांकानुसार येण्याऐवजी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवले. पहाटे पाच वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावत पुरता गोंधळ केला. गर्दी हाताबाहेर गेल्यावर शेवटी वैतागून काउंटर बंद करण्याची वेळ पोस्ट कार्यालयावर आली. 

सकाळी सहा वाजल्यापासून पोस्ट कार्यालय ते शगुन चौकापर्यंत नागरिकांनी रांग लावली होती. अनेक जण पहाटे पाच वाजल्यापासून नंबरसाठी येऊन थांबले होते. सकाळी दहा वाजता पोस्ट कार्यालय उघडण्यात येते. प्रत्येक दिवशी 30 टोकन दिले जातात, सोमवारी (ता. 18) 107 जणांचे खाते उघडण्यात आले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु, सरकारकडून पैसे मिळणार आहेत. जनधन योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले आहेत. काही ठराविक लोकांचेच पैसे पोस्टात जमा झालेले आहे, अशा विविध अफवा पसरविल्यामुळे ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दी इतकी, की सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडला होता. ज्यांच्याकडे टोकन नव्हते, त्यांनीदेखील गर्दी केली होती. नेमके करावे काय, असा प्रश्‍न कार्यालयावर पडला होता. नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीच नव्हते. रांगेत थांबण्यावरून अनेकांचे वाद झाले. पोस्टाने दोन काउंटरची सोय केली आहे, पण नागरिक गोंधळ करत असल्यामुळे आज सकाळपासून फक्त दहा खाती उघडण्यात आली. रोस्टर पद्धतीने कर्मचाऱ्यांना 'ड्यूटी' लावली आहे. नेटवर्कच्यादेखील समस्या आहे, तरीही आम्ही नागरिकांना सहकार्य करत असल्याचे पोस्ट मास्तर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

"आयपीपीबी खाते उघडण्याचे रूटीन काम आहे. तरीही नागरिकांनी गर्दी केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खाते उघडण्यात येणार आहे. त्यासाठी टोकन दिले जात आहे. हे खाते उघडल्यावर घरबसल्या तुम्ही सुकन्या, आरडी, पीपीएफ खात्यावर पैसे जमा करू शकता. त्यामुळे ग्राहकांनी विनाकारण गर्दी करू नये.''

- के. एस. पारखी ,जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड पोस्ट कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT