पिंपरी-चिंचवड

कारवाई थांबली, पण भीती कायम; भोसरी रेडझोनमधील नागरिकांची भावना 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : वडमुखवाडी शिवारातील रेडझोन हद्दीत बांधकामे झाली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सलग दोन दिवस कारवाई करून 79 बांधकामे भुईसपाट केली. त्यात काही पक्की घरे होती. तर काही पत्राशेड होती. आता दोन दिवसांपासून कारवाई थांबली आहे. मात्र, शिल्लक राहिलेल्या दहा-पंधरा घरांतील रहिवासी आणि कारवाई झालेल्या नागरिकांमध्ये भीती कायम आहे. 

दिघी- मॅगझीन परिसरात संरक्षण विभागाची आस्थापना आहे. त्याचा रेडझोन भोसरीतील चक्रपाणी वसाहतीपासून चऱ्होलीतील वडमुखवाडीपर्यंत आहे. या भागातील जमिनीवर प्लॉटिंग करून दहा ते बारा लाख रुपये गुंठेप्रमाणे विकण्यात आल्या आहेत. काहींनी अर्धा गुंठा ते तीन गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट नागरिकांनी घेतले आहेत. काहींनी पक्की घरे बांधून तर काहींनी पत्राशेड उभारून निवारा उभारला होता. येथील बांधकामांवर गेल्यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात कारवाई केली होती. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. या काळात काही नागरिकांनी पुन्हा बांधकामे केली. त्यांना दोन महिन्यांपूर्वी नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर कारवाई करून बांधकामे पाडली. अद्याप दहा-पंधरा घरे बाकी आहेत. आपल्यावरही कारवाई होईल, अशी भिती त्यांच्या मनात आहे. त्यातील काहींनी घरातील साहित्य अन्य ठिकाणी हलविले आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांनी बाजूलाच तंबू उभारून संसार थाटला आहे. पुन्हा घर बांधल्यास पुन्हा कारवाई होईल, अशी भितीही त्यांना आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पार्किंग प्लॉट कायम 
रेडझोन हद्दीमध्ये काही पार्किंग प्लॉट आहेत. या ठिकाणी कंटेनर उभे केले जातात. त्यांच्या रक्षणासाठी काहींनी चारही बाजूने साधारण पाच फूट उंचीच्या संरक्षक भिंती उभारल्या असून काहींनी तारेचे कुंपण घातले आहे. मात्र, त्यावर कारवाई झालेली नाही. सिमेंट खांब उभारून व तारेचे कुंपण लावूनसुद्धा प्लॉट आखले आहेत. ते खांबही तसेच उभे आहेत. 

नागरिक म्हणतात... 
आई-वडील व भावांना न विचारता गावाकडची माझ्या वाट्याची शेती विकली आणि दोन वर्षांपूर्वी एक गुंठा जागा घेतली. घर बांधून दोनच महिने झाले आहेत. दोन दिवस कारवाई सुरू होती. त्यामुळे आपलेही घर पाडणार पण, कारवाई थांबली. आता पुन्हा कारवाई करतील का? असा काकुळतीचा प्रश्‍न एका तरुणाने 'सकाळ' प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरी एमआयडीसीतील एका झोपडपट्टीत राहात असलेल्या महिलेनेसुद्धा अर्धा गुंठा जागा घेऊन पक्के घर बांधले होते. ते कारवाईत पाडण्यात आले. त्याबाबत, "जागा घेताना व बांधताना आमच्या भागातील नगरसेविकेला विचारले होते. त्या वेळी त्यांनी "बांधा बिनधास्त, काही कारवाई-बिरवाई होत नाही,' असे सांगितले होते. म्हणून जागा घेऊन बांधली. आता फोन केला, तर ती बाई फोनसुद्धा उचलत नाही,'' अशी व्यथा मांडली. स्थानिक रहिवासी म्हणाली, "माझीसुद्धा येथे पाच गुंठे जागा आहे. गेल्या वर्षी बांधून भाड्याने खोल्या द्यायचा विचार होता. पण, कोरोना व लॉकडाउनमुळे बांधू शकलो नाही. आता तर आर्थिक गणितच बिघडले आहे. त्यामुळे बांधणे शक्‍य नव्हते. अन्यथा माझेही बांधकाम पाडली गेले असते.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT