पिंपरी-चिंचवड

VIDEO : चिंचवडच्या आनंदनगरमध्ये नागरिक पुन्हा रस्त्यावर, मग पोलिसांना हे कराव लागलं

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे लोक रस्त्यावर फिरत आहेत. त्याप्रमाणे आम्हालाही फिरू द्या', अशी मागणी करत संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना चिंचवड येथील आनंदनगर परिसरात सोमवारी (ता. 8) दुपारी झाली. त्यानंतर पोलिसांनी हा प्रकार थांबवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. 

कोरोनाच्या संसर्गामुळे आनंदनगरचा परिसर पूर्णपणे बंद केला आहे. मात्र, नागरिक या भागातील बॅरिकेड तोडून रस्त्यावर धावत सुटले. पोलिसांसाठी लावण्यात आलेल्या मंडपातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकून देत, हे लोक रस्त्यावर धावत सुटले होते. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आनंदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला. त्यानंतर 20 मे रोजी असाच प्रकार झाला होता. त्यानंतर या भागातील नागरिक अशाच प्रकारे रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी या भागाला भेट देऊन लोकांची समजून काढून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आनंदनगर भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे महापालिकेने हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून हा संपूर्ण परिसर पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या प्रकारानंतर या भागातील लोकांनी पत्रे आणि बांबू तोडून थेट रस्त्यावर प्रवेश केला. या परिसरात टाकण्यात आलेला मंडपदेखील तोडून टाकला. 
हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांची राज्य राखीव दलाची तुकडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, दगडफेक करणाऱ्या नागरिकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT