Civet Cat Sakal
पिंपरी-चिंचवड

हिंजवडीत आयटीत आढळले उदमांजर; प्राणी मित्रांनी सोडले जंगलात

हिंजवडी फेज-३ येथील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये घुसलेल्या उदमांजराला प्राणी मित्रांनी जंगलात सोडून जीवदान दिले.

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी फेज-३ येथील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये घुसलेल्या उदमांजराला प्राणी मित्रांनी जंगलात सोडून जीवदान दिले.

हिंजवडी - भटकंती करता-करता हिंजवडी फेज-३ येथील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये घुसलेल्या उदमांजराला प्राणी मित्रांनी कोणतीही इजा होऊ न देता अलगत शिताफीने पकडुन पौड वन अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार त्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले.

रविवारी (ता. २५) रात्री ८. ३० वाजता सर्पमित्र अजित भालेराव यांना फोन आला की मांजरासारखा दिसणारा कुठला तरी प्राणी कँटीनमध्ये शिरला आहे.

भूतकर यांनी ही माहिती वाईल्ड अँनिमल्स अँण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी संस्थेतील सर्परक्षक तुषार पवार, शेखर महाराज जांभूळकर तसेच गणेश भुतकर यांना दिली. त्यानुसार या प्राणीमित्रांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली. पाहणी केली असता ते जंगली उदमांजर (Civet Cat) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन ५ किलो व उंची गुडघ्याच्या मानवी खालोखाल होती. याबाबत मुळशीचे वनरक्षक पांडूरंग कोपनर यांना ही माहिती देण्यात आली.

त्यांच्या सूचनेनुसार उदमांजराला पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आल्याने प्राणी मित्रांचे उपस्थितांनी आभार मानत कौतुक केले. दुर्मिळ होत चाललेले उदमांजर हा सस्तन व सर्वहारी प्राणी आहे. उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक, फळे, खेकडे हे त्याचे खाद्य आहे.

निशाचर उदमांजराच्या अंगावर काळसर, राखाडी केस व लहान काळ्या ठिपक्यांच्या रेषा असतात. शेपटी काळपट व झुपकेदार असते मानवी वस्तीजवळ व जंगलामध्ये आढळतो. सहसा दिवसभर झाडांवरील ढोलीमधे आराम करून रात्रीच्यावेळी हा प्राणी खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT