पिंपरी-चिंचवड

लॉकडाउन असो किंवा नसो...यांचं काम कधीही थांबत नाही...

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी (पुणे) : सण...उत्सव...नाकाबंदी असो वा अजून काही संपूर्ण समाज आपापल्या कामात व्यस्त असतो. तसेच, उत्सव व सणाचा आनंद घेतो. लॉकडाउन म्हणजे सर्वसामान्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी केविलवाणी कसरतच. काम नाही. पैसा नाही. त्यात भाड्याचे घर. एक ना अनेक समस्यांचा डोंगर, तरीही कुरबूर न करता उभा असलेला कष्टकरी वर्ग. असाच एक कामगार वर्ग म्हणजे सफाई कामगार. स्वत: कचऱ्यात राहून इतरांसाठी स्वच्छता करून देणारे हे कामगार आज लॉकडाउनमध्येही काम करत होते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटात डॉक्टर,पोलिस व त्या संबंधित सर्व प्रशासनातील व्यक्ती अहोरात्र झटत आहेत. कडक उन्हाळ्यातही ते आपले काम चोख करत होते. ते आजही पुन्हा लॉकडाउनमध्ये व्यवस्थापन व नियोजनासाठी सज्ज झाले आहेत. अशातच या सर्व कामाचा अविभाज्य घटक असलेले सफाई कामगार जिवाची पर्वा न करता तोकड्या सुरक्षा व्यवस्थेसह काम करताना पहायला मिळतात.

ते परिसराची स्वच्छता करतात म्हणून शहर व परिसर स्वच्छ दिसतो. सकाळी सातपासून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करतात. सध्या पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन सुरू झाला आहे. यात पोलिस प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पोलिसांकडून विविध भागात व मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. एकीकडे विनाकारण फिरणाऱ्यांची चेक नाक्यांवर कसून तपासणी पोलिस यंत्रणा करत आहे. तर दुसरीकडे त्याच बाजूला सांगवी-दापोडी पूल परिसरातील स्वच्छता करताना स्वच्छता कामगार दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT