पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : थंडीचा कडाका अन्‌ पावसाची रिमझिमही 

सुवर्णा नवले

पिंपरी : शहरात ऐन हिवाळ्यात पावसाचा खेळ सुरू झाल्याने नागरिक अवाक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ होते. दरम्यान, आज सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. हवामान कोंदट झाले आणि सकाळी दहापासून दुपारी दीडपर्यंत पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. दुपारी तीननंतर पुन्हा ऊन पडले. विषांणूना असे वातावरण पोषक असल्याची अशी भीती वैद्यकीय क्षेत्राने व्यक्त केली आहे. त्यामुळे काही अंशी कोरोना पसरण्याची धाकधूक पुन्हा नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. 

शहरात सकाळी व दुपारच्या उन्हातही पाऊस उघडल्यानंतर बाष्पाची चादर पसरली होती. त्यामुळे वातावरणात धुके पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. बऱ्याच जणांनी दिवसाही वायपर लावून गाड्या चालविल्या तर दुचाकी चालकांनाही या वातावरणाचा सामना करावा लागला. वाहतूकही काहीशी मंदावली. दापोडी, खडकी, कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी आदी भागांत सकाळी दहापासून हलक्‍या सरीने हजेरी लावली. यामुळे बाजारातील विक्रेते, फेरीवाले यांची धांदल उडाली. अचानक हजेरी लावलेल्या पावसाने नागरिकांचे मास्कही ओले झाले. काही प्रमाणात वातावरणात गारवा असल्याने पावसातही नागरिक स्वेटर घालून वावरताना दिसले. रेनकोटला एक महिन्यापूर्वीच गुंडाळून ठेवल्याने नागरिकांना भिजण्याची वेळ आली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे असे वातावरण या मुळे ज्येष्ठ नागरिकांना काळजी वाटू लागली आहे. कित्येक दिवसांनी व्यावसायाची घडी बसलेल्या व्यावसायिकांनाही या वातावरण बदलाची धास्ती आहे. सकाळी रिमझिम सुरू झालेल्या पावसाने दुपारी दीडपर्यंत जोरदार बरसात केला. पावसाची सर मोठी व हवेत बाष्प निर्माण झाल्याने चालकांना वाहने चालविण्याची कसरत करावी लागली. दुपारी दोन नंतर पुन्हा ऊन पडले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वायसीएम रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून साथीच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. यात चिकुणगुणिया व सांधी दुखीच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यातील काहींना तापाचीही लक्षणे आहेत. वातावरण बदलामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
- राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis:...हा तर पोळी भाजण्याचा डाव; दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Live Updates Marathi : सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

Farmer Loan Waiver: दोन लाख शेतकरी पहिल्या यादीत; कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी अनिवार्य

SCROLL FOR NEXT