पिंपरी-चिंचवड

महावितरण-वीजग्राहक यांच्यातील संवादाचा हा पहिलाच प्रयोग, वाचा...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाउन सुरू असला, तरी महावितरण आणि पिंपरी विभागातील तब्बल 180 हाउसिंग सोसायट्यांच्या फेडरेशनचे 56 प्रतिनिधी यांच्यातील थेट संवादाचा ऑनलाइन 'वेबिनार' कार्यक्रम घेण्यात आला. महावितरण व वीजग्राहक यांच्यातील अशा संवादाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

महावितरणच्या पिंपरी विभागअंतर्गत वाकड, हिंजवडी, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रावेत, पुनावळे आदी परिसरातील सुमारे 18 हजार वीजग्राहकांच्या 180 हाउसिंग सोसायट्यांची शिखर संस्था म्हणून पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशन कार्यरत आहे. या सर्व परिसरातील वीजप्रश्न, महावितरणची विकासात्मक कामे, ग्राहकसेवा आदींबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाइन वेबिनारचे गुरुवारी (ता. 14) आयोजन करण्यात आले होते. चर्चात्मक 'सेमीनार' सारखाच मात्र, वेबद्वारे ऑनलाइन होणाऱ्या कार्यक्रमास 'वेबिनार' म्हटले जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सुमारे दीड तासांच्या या वेबिनारमध्ये या 180 सोसायट्यांच्या परिसरात होणारी वीजयंत्रणेतील नवीन कामे, मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच प्रामुख्याने ऑनलाइन वीजबिल भरणा, विविध ग्राहकसेवा, सोसायट्यांसाठी नव्यानेच सुरू करण्यात आलेली आरटीजीएस व एनईएफटीची सुविधा आदींची माहिती देण्यात आली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीजग्राहकांनी मोबाईल ऍपच्या किंवा वेबसाईटच्या माध्यमातून मीटर रिडींग पाठविण्याचे तसेच, ऑनलाइनद्वारे वीजबिल भरणा करण्याची विनंती महावितरणकडून यावेळी करण्यात आली. वीजविषयक स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक शंका किंवा प्रश्‍नांना महावितरणकडून माहितीसह उत्तरे देण्यात आली. तसेच, लॉकडाउनच्या कालावधीत महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनीही वेबिनार उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांना धन्यवाद दिले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेबिनारमध्ये मुख्य अभियंता सचिन तालेवार, गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रेय बालगुडे, उपकार्यकारी अभियंता संतोष पटनी, अमोल बनसोडे, स्मीता अंबाडकर, व्यवस्थापक (लेखा व वित्त) गणेश दांगट, सहाय्यक अभियंता सनी टोपे तसेच पिंपरी चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनकडून माजी अध्यक्ष व वेबिनारचे मुख्य संयोजक सुदेश राजे, चिटणीस के. सी. गर्ग, सचिन लोंढे, अरुण देशमुख, सुधीर देशमुख, दत्तात्रेय देशमुख, हेमचंद्र कुरील, विजय गानू आदींसह विविध सोसायट्यांच्या 56 पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारसाठी जयवंत घोडके यांनी तांत्रिक सहाय्य केले, तर डॉ. वैशाली घोडके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा? बड्या नेत्याचा दावा, नेमकं काय म्हणाले?

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने अचानक कर्णधारपद का सोडलं? गुवाहाटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? स्मृती मानधना शर्यतीत,पण...

कंटेनरची दुचाकीला धडक, ३ किमीपर्यंत फरफटत नेलं; आईसह २ चिमुकल्या मुलींचा मृत्यू, रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे

Viral Video: खाकी वर्दीचा दरारा आखाड्यातही! CM योगींच्या बंदोबस्तावरून परतला अन् आव्हान देणाऱ्या मल्लाला केलं चितपट

Marathi News Live Updates: इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान संजय राऊत यांना भोवळ; उन्हाचा त्रास, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी पोलिसांची चर्चा

SCROLL FOR NEXT