पिंपरी-चिंचवड

VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्याच पावसात नाल्यांची ही अवस्था झालीय

सुवर्णा नवले

पिंपरी : पावसाळ्यापूर्वीच्या नाले सफाईचा दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरात गाजावाजा होतो. लॉकडाउनचा कालावधी हाती मिळूनही नाले योग्य पद्धतीने स्वच्छ झाले नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. गतवर्षी आलेल्या पुराच्या पाण्याने नाले ओव्हरफ्लो झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, सध्या पूर परिस्थिती नसूनही बुधवारी (ता. 3) जोरदार झालेल्या पहिल्याच पावसात पिंपरी-चिंचवडकरांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला. नाले तुंबल्याने रस्ते बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे.

कासारवाडीतील शंकरवाडी येथील नाल्याची काही दिवसांपूर्वीच स्वच्छता झाली. मात्र, तरीही नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. या भागात नाल्याच्या पाण्याने दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावर सर्वत्र गाळ साचल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन वाहने चालवीत आहेत. गाड्या घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. नाल्यातील कचरा योग्य पद्धतीने न उचलला गेल्याने रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याने सर्वत्र कचरा पसरला आहे. त्यानंतर अखेर प्रशासनाला रस्ता बंद करावा लागला आहे. त्याचप्रमाणे शंकरवाडीतील नाल्यात मुंबई- पुणे महामार्गालगतचाही कचरा आल्याने आणखीनच भर पडली आहे. रस्त्यावर मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. दोन दिवसांपासून येथील गाळ हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने नाले स्वच्छ केल्याचा दावा केला असला, तरी तो प्रत्यक्षदर्शनी फोल ठरल्याचे चित्र आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दापोडीतही हाच प्रकार घडला. अनेक ठिकाणी चेंबर तुंबले. या भागातही आठ दिवस नाले स्वच्छतेचे काम सुरू होते. तरीही, चव्हाण चाळ, काची चाळ, सरस्वती अनाथ आश्रम, हिवाळे चाळ, विश्‍वासे चाळ, एसएमएस कॉलनी येथील घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बऱ्याच जणांना दुकाने बंद करावी लागली. अखेर, पावसाने उघडीप दिल्याने येथील नागरिकांच्या जिवात जीव आला. त्याचप्रमाणे नवी सांगवीतील माहेश्‍वरी चौक व एम. एस. काटे चौकातील नागरिकही घाबरले. कारण गतवर्षी आलेल्या पुराच्या पाण्यात या भागातील जनजीवन नाल्याच्या पाण्याने विस्कळीत झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय आहे नाल्यांची सद्य:स्थिती 

शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळून 17 नाले आहेत. काही नाले अद्यापही खुले आहेत. काही ठिकाणी बंदिस्त आहेत. बऱ्याच नाल्यांची खोली अद्यापपर्यंत वाढविलेली नाही. त्याचप्रमाणे अती जोखीम असलेल्या नाल्यांमधील गाळ व झाडेझुडपे अद्यापही क्रेनने हटविलेली नाहीत. तसेच शंकरवाडी, नाशिकफाटा, दापोडी येथील नाल्यांमध्ये अद्यापही प्लॅस्टिक कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. तर काही ठिकाणी नाल्यांमध्ये व बाहेरही गाळ रस्त्यांवरच साचलेला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. जोरदार पावसानेही या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना नाले सफाई संदर्भात संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT