Kailas Kadam Sakal
पिंपरी-चिंचवड

काँग्रेसच्या वाढत्या जनाधारमुळे सोनिया गांधी यांची इडी चौकशी - कैलास कदम

मागील आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजक्तेकडे वाटचाल करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मागील आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजक्तेकडे वाटचाल करीत आहे.

पिंपरी - मागील आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजक्तेकडे वाटचाल करीत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, जुलमी राजवट या विरोधात काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर येऊन सामान्यांचे प्रश्‍न मांडत आहे. त्यामुळे देशभर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जनाधार वाढत आहे. याच्या भीतीपोटी मोदी, शहा यांचे जुलमी सरकार हे सोनिया गांधी यांची वारंवार इडीच्या नावाखाली चौकशी करून नाहक त्रास देत आहे, अशी टीका काँग्रेसचे शहर अध्यक्ष कैलास कदम यांनी केली.

सुमारे १० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इडीने हे प्रकरण संपवले. आता पुन्हा हे प्रकरण पुनरुज्जीवित केले. या मोदी सरकारच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर-जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कासारवाडीतील नाशिक फाटा चौक येथे मंगळवारी (ता. २६) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत सोनिया गांधी यांना चौकशीनंतर परत येऊ दिले जात नाही तोपर्यंत आमचा सत्याग्रह सुरूच राहील, असे कदम यांनी सांगितले.

सत्याग्रह आंदोलनात माजी महापौर कवीचंद भाट, निगार बारस्कर, बाबू नायर, निर्मला कदम, सायली नढे, नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, कौस्तुभ नवले, विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, ॲड. उमेश खंदारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT