Bebetai Jadhav Sakal
पिंपरी-चिंचवड

तुटलेले संसार जोडणारी वाकडची ‘नवदुर्गा’ बेबीताई जाधव

आजवर काडीमोडापर्यंत गेलेले १५० हून अधिक संसार बेबीताईच्या न्यायालयात जोडले गेले.

सकाळ वृत्तसेवा

आजवर काडीमोडापर्यंत गेलेले १५० हून अधिक संसार बेबीताईच्या न्यायालयात जोडले गेले.

वाकड - सामोपचाराने विस्कटलेले संसार पुन्हा फुलण्यासह असंख्य गोष्टी सुरळीत होऊ शकतात असे सांगत अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी असतो, हे ठासून सांगणाऱ्या बेबीताई जाधव (Bebitai Jadhav) वाकडच्या काळाखडक भागात राहतात.

आजवर काडीमोडापर्यंत गेलेले १५० हून अधिक संसार बेबीताईच्या न्यायालयात जोडले गेले. दोष वर पक्षाचा असो की वधूपक्षाचा दोघांचीही समजूत घालण्यात ताई पटाईत. त्यांचा संसार रांगीरुपी लागण्यासाठी वेळप्रसंगी त्या रुद्रावतार धारण करतात. भल्या भल्यांना वठणीवर आणतील, अशी त्यांची न्याय निवाड्याची पद्धत. दारूच्या आहारी जाऊन संसार उद्ध्वस्त करणाऱ्या मद्यपींचा त्या चांगलाच समाचार घेतात. पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला वेळप्रसंगी पुरुषांच्या गराड्यातच चोप द्यायला त्या मागेपुढे पाहात नाहीत. संसार सुखाचे व्हावेत, अशा त्यांच्या आंतरिक तळमळीमुळेच त्या सर्वांच्या प्रिय बनल्या आहेत. त्यांची आदरयुक्त भीती आहे.

गेल्या २५ वषार्पांसून त्यांचा दीन दुबळ्यांना, महिलांना मोठा आधार आहे. संकटकाळी रात्री-अपरात्री कोणीही त्यांचे दार ठोठावावे. मदत मिळणारच. व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या स्त्रियांच्या आश्रयाचे घर देखील हेच मागासवर्गीय समाजात जन्मल्यानंतर अनेकदा त्यांच्या नशिबी उपेक्षाच आली आठ बहिणीत त्या पाचव्या क्रमांकाच्या माण हे त्यांचे मूळ गाव. आई-वडील शेतीत मजुरी करायचे. चौथीत शिकत असतानाच वर्गात जातिवाचक बोलणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी चोप दिला. त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. तर चुलत बहिणीची छेड काढणाऱ्या एका नामवंत पुढाऱ्याची त्यांनी किशोरवयातच धुलाई केली. धडाकेबाज स्वभावाचा उपयोग त्यांनी महिलांच्या मदतीसाठी केला. व्यसनी पतीमुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागला. हा त्रास स्वतः भोगल्याने त्यांनी अबला महिलांची अशा छळातून सोडवणूक करण्यास सुरुवात केली.

आधी ताईंचे कोर्ट मग पोलिस ठाणे

पती-पत्नीमधील भांडण सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी त्या दोघांच्याही श्रीमुखात भडकावतात. भांडणे सोडविण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याऐवजी ताईचीच प्रथम मदत घेतली जाते. कर्करोगाच्या आजाराने काजल आणि सोनाली या मुलींचे छत्र हरपल्याने त्यांची सर्वस्वी जबाबदारी ताईंनी आपल्या खांद्यावर घेतली. दहा वर्षांपासून ताईंनी त्यांचे पालकत्व स्वीकारत नुकतेच त्यांचे लग्नही लावून दिले. समाजात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या बेबीताईंनी मुलांवर देखील उत्तम संस्कार केले मोठे चिरंजीव अनिल जाधव हे वंचित बहुजन आघाडीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत असून, त्याद्वारे तेही सक्रिय समाजसेवेत आहेत. लहान मुलगा संजय जाधव याने उद्योग क्षेत्रात आपला जम बसविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT