पिंपरी-चिंचवड

Video : महावितरणच्या वीजबिलांच्या गोंधळामुळे नागरिकांच्या नाकीनऊ, काय अडचणी येतायेत पाहा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यांपासून महावितरणकडून घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणे, वीजबिल पाठविणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीजबिल पोहोचली नव्हती. मात्र, या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून सरासरी वीजबिलाऐवजी अवास्तव वाढीव रकमेचे पाठविल्यामुळे ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत. अशा तक्रारींसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध वीज ग्राहक तक्रार निवारण कक्षात ग्राहकांनी गर्दी केली आहे. त्यातच तीन महिन्यांच्या बिलाचे युनिट एकत्र करून व त्यानुसार विजेच्या आकारणीचे दर ठरवून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. 

कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला मीटर रीडिंग न घेता सरासरी वीजबिल देण्यात आले. महावितरणने एप्रिल महिन्यापासून वीज आकारणीचे नवीन दर निर्धारित केले आहे. या दरानुसार 100 युनिटपर्यंत प्रतियुनिट 3 रुपये 46 पैसे व यानंतर 300 युनिटपर्यंत 7 रुपये 43 पैसे याप्रमाणे टप्प्याटप्प्याने एक हजार युनिटपर्यंत वीज आकारणी वाढीव दर लावून स्लॅब टाकण्यात आले. त्यामुळे दर महिन्याला सरासरी 100 युनिटपर्यंत वीज खर्च करणाऱ्या या घरगुती ग्राहकाला तीन महिन्यांचे 700 ते 800 युनिटचे बिल देऊन तसेच, याप्रमाणे वीज आकारणीचे दर ठरवून विजेची बिल देण्यात आली. त्यामुळे नागरिकांत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन महावितरणच्या लूटमार धोरणाबाबत रोष व्यक्त होत आहे. मागील आठ दिवसापासून सर्वच भागातील वीज कार्यालयाच्या ठिकाणी वीजबिल कमी करण्यासाठी व त्याबद्दल तक्रार करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्राहक म्हणताहेत...

ग्राहक प्रमोद शिंदे म्हणाले, "कोरोना महामारीच्या संक्रमणात कामधंद्याअभावी आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांचे या कंपनीने कंबरडेच मोडले आहे. जरी महावितरणने सरासरी बिल काढले असले, तरी त्या बिलांमध्येही मोठी तफावत आहे. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नीट माहिती देण्यात येत नाही.'' 

विशाल बाबर म्हणाले, "आधीच टाळेबंदीत हाताला काम नाही अशामध्ये हजारोंच्या फरकाने आलेली वीज देयके कशी भरायची? कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"लॉकडाउनमध्ये ग्राहकांच्या घरगुती मीटरचे रीडिंग न घेता त्यांच्या हाती तीन महिन्याचे एकसाथ बिल थोपविण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. मात्र, आता जून महिन्यापासून मीटर घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील जुलै महिन्यापासून ग्राहकांना मीटर रीडिंगच्या वापरानुसार देयके देण्यात येतील.'' 

- शिवाजी वायफळकर, कार्यकारी अभियंता, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT