पिंपरी-चिंचवड

कामशेत खिंडीत कंटेनर उलटला अन्...

सकाळ वृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ) : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत सकाळी एक कंटेनर उलटून अपघात झाला. यात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कामशेत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून लेन खुली केली. सुदैवाने दोन्ही लेनवर वाहने नसल्यामुळे मोठा धोका टळला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विठ्ठल अन्नपा क्षीरसागर (वय अंदाजे ३२, रा. सांगली) हा कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी  माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास पुणे-मुंबई लेनवर कंटेनर  (एमएच ४३, बीजी ९४७०) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुसऱ्या लेनवर उलटला.

या अपघातात कंटेनर चालक हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कामशेत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पवार, समीर शेख, हनमंत वाघमारे, संतोष शिंदे, होमगार्ड गणेश गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करीत महामार्ग वाहतुकीस खुला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT