Pimpri chinchwad : सेलेस्टियल सिटी सोसायटीत दूषित पाणीपुरवठा sakal media
पिंपरी-चिंचवड

Pimpri chinchwad : सेलेस्टियल सिटी सोसायटीत दूषित पाणीपुरवठा

आरोग्य विभाग आणि ड्रेनेज विभाग एकमेंकाकडे बोट; महापालिकेचा अहवाल गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीत गेल्या अनेक दिवसांपासून काही भागात पांढरट रंगाचे जंतुयुक्त पिण्याचे पाणी येत आहे. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे सोसायटीधारक आजारी पडल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत सोसायटीधारकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे. यावरून आरोग्य विभाग आणि ड्रेनेज विभाग एकमेंकाकडे बोट दाखवीत आहे. महापालिकेकडून अहवाल देण्यास टाळाटाळ सुरू आहे.

सोसायटीमधे सातशे सदनिका आहेत. त्यात तीन हजाराच्यावर नागरिक राहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहेत. महापालिका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. सोसायटीच्या अनेक नागरिकांच्या घरी दूषित पाणी आल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमध्ये लिकेज निर्माण झाल्याने होणाऱ्या दूषित व जंतुयुक्त पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सर्व प्रकारचे कर वेळेवर भरूनही प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.

महापालिकेचा अहवाल गुलदस्त्यात

शुक्रवारी (ता. २६) दूषित पाणीपुरवठा झाल्याचे महापालिका अधिकाऱ्यांना कळवूनही अधिकाऱ्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. शनिवारी (ता.२७) महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या निगडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पाणी तपासणी केली. याठिकाणी अतिरिक्त क्लेरिनयुक्त पाणी पुरवठा होत नसून त्या पाण्यात दूषित पाणी मिसळले जात असल्याचे , प्राथमिक तपासणी अंती सांगितले. दिवसांत पाणी तपासणीचे अहवाल येतील, असे सांगितले. दुरुस्तीसाठी ड्रेनेज विभागाला बोलावण्यात आले होते. परंतु नेमके काय झाले होते व काय दुरुस्ती केली याचा कुठलाही लिखित अहवाल देण्यात बुधवारपर्यंत (ता. १) सोसायटीला कोणताही अहवाल देण्यात आला दिला नाही.

‘‘दूषित पाणी पुरवठ्याने सोसायटीतील जवळपास पाचशेच्या वर रहिवासी आजारी पडले आहेत. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने मदत करायला हवी होती; परंतु महापालिका या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. महापालिका आयुक्तांना सांगूनही कृती शून्य आहे. ’’

- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा, सेलेस्टियल सिटी फेज १ फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT