पिंपरी-चिंचवड

पिंपरी : वायसीएममधील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा उपचारानंतर रिपोर्ट समोर; आता...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे संत तुकाराम नगरमधील वायसीएम हाॅस्पिटल. सध्या शहरात प्रत्येकाच्या तोंडी असलेले नाव. गेल्या तीन महिन्यांपासून अधिक चर्चेत आलेले रुग्णालय. कारण, कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण शहरात आढळला तेव्हापासून वायसीएम हाॅस्पिटल कोरोना अर्थात कोविड-19 साठी राखीव ठेवण्यात आले. परंतु,एक दिवस येथील एका डाॅक्टरांनाच संसर्ग झाला आणि प्रशासन हादरले. अन्य डाॅक्टर, नर्स, सेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पण, सर्वांनी धीराने घेतले. आपली रुग्ण सेवा सुरूच ठेवली. त्या रुग्णांमध्ये ते पाॅझिटिव्ह डाॅक्टरही होते. शनिवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

संपूर्ण वायसीएम हाॅस्पिटल कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव आहे. येथील अन्य आजाराचे रुग्ण शेजारच्या खाजगी रुग्णालयांत दाखल केले आहेत. याबाबत दोन्ही रुग्णालयांत सामंजस्य करार झाला आहे. वायसीएमची क्षमता साडेसातशे बेडची आहे. सात मजली इमारतीत एक मजला बाॅईज होस्टेल आहे. अर्थात निवास डाॅक्टरांची सोय तिथे आहे. शिवाय, तीन वर्षांपूर्वी वायसीएममध्ये सुरू झालेला पदव्यूत्तर अभ्यासक्रम व त्यामुळे वाढलेले डाॅक्टरांचे संख्याबळ यासाठी वायसीएम बाॅईज होस्टेल महत्त्वाचे ठरत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वायसीएमच्या बाॅईज होस्टेल मध्ये राहणारे एका निवासी डॉक्टरांचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडील तपासणी अहवाल सहा जून रोजी पाॅझिटीव्ह आला होता. या डाॅक्टरांचा थेट पाॅझिटीव्ह रुग्णांशी संपर्क येत होता. पीपीई कीट व अन्य सर्व प्रकारे काळजी घेऊनही त्यांना संसर्ग झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

परंतु, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार सात दिवसांच्या उपचारानंतर संबंधित डाॅक्टरांचे नमुने तपासण्यात आले. त्यांचा अहवाल शनिवारी मिळाला. निगेटिव्ह अहवाल पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला असून आपल्या सहकाऱ्यांने कोरोनावर यशस्वी मात केल्याचे समाधानही त्यांना मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : पुण्यात पोलिस अधिकाऱ्याला अडीच लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT