पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोरोनाने हिरावला आनंदनगरचा 'आनंद'

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आनंदनगर. पिंपरी- चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील ठिकाण. चिंचवड रेल्वे स्टेशन लगत पन्नास वर्षांपूर्वी वसलेली झोपडपट्टी. अनेक धर्म,पंथ, जाती, जमातीतील लोक येथे राहतात. कोणी विदर्भातून आलंय. कोणी मराठवाड्यातून आलंय.

कोणी कर्नाटकातून आलंय तर कोणी तेलंगणातून. रोजंदारी हेच यांचं उदरनिर्वाहाचं साधन. कोणी सुरक्षारक्षक आहे. कोणी कंपनीत कंत्राटी कामगार. कोणी रिक्षा चालवतोय तर कोणी हातगाडी, टपरी लावून दोन पैसे कमावतोय. एका घरात चारपेक्षा अधिक सदस्य आहेत. अशी विविधता असली तरी एकात्मता दिसून येते. सर्व सण-उत्सव आनंदात साजरे करणाऱ्या आनंदनगरवर आज एक संकट आलंय.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक महामारी कोरोनानं आनंदनगरमध्ये शिरकाव केला आहे. बारा दिवस झाले. कोरोनानं त्यांना झपाटलं आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढते आहे. रविवारी सकाळी ११ पर्यंत येथील रुग्ण संख्या सत्तरच्या वर गेली. आजपर्यंत पाॅझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडे तपासण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील संशयितांना रुग्णालयात तर, ज्येष्ठ नागरिक व अन्य संपर्कातील व्यक्तींना शाळेत क्वारंटाइन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण आनंदनगर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. वसाहतीत जाणा-या सर्व वाटा पत्रे लावून बंद केल्या आहेत. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. बाहेरील व्यक्तींना आत जाण्यास आणि आतील व्यक्तींना बाहेर जाण्यास मनाई आहे. ही सर्व खबरदारी आनंदनगरमधील नागरिकांच्या भल्यासाठी घेतली आहे. त्यांचा आनंद त्यांना परत मिळवून देण्यासाठी घेतली आहे. 

असे आढळले आनंदनगरचे रुग्ण

तारीख/रुग्ण

१३ मे/२
१४ मे/१
१५मे/१
१६मे/२
१७मे/४

१८मे/१८
१९मे/३
२०मे/५
२१मे/७
२२मे/१२
२३मे/१५
२४मे/१ (दुपारी बारा पर्यंत)

एकूण/७१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT