tea.jpg 
पिंपरी-चिंचवड

चहाची तल्लफ बेततीये जिवावर; चहाच्या टपऱ्यांववरून वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

सकाळवृत्तसेवा

देहू : कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतही कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असून देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड कोरोनाचे हॅाटस्पॅाट ठरत आहे. मंगळवारी (ता. 8) देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या विविध भागात 18 रुग्ण आढळले. त्यामुळे बोर्डाच्या हद्दीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 917 झालेली आहे. त्यापैकी 787 रुग्णांवर उपचार झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 26 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 104 रुग्ण अॅक्टीव आहेत. दिवसेदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे बोर्डाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. तसेच सध्या बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कॅटोन्मेंट बोर्डास केंद्र व राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहे.

मात्र, कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या रोखता येण्यासाठी कॅटोन्मेंट बोर्डाकडून ठोस उपाय योजना करण्यात येत असल्यातरी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याची शहरातील नागरिकांत चर्चा आहे. बाजारपेठेतील भाजीमंडई, दुकाने, हॅाटेल्स सुरु करण्यात आले. त्यामुळे शहरात गर्दी वाढली. कोणीही आज सोशल डिस्टन्सचे पालन करत नाही. बाजारपेठेत राजरोसपणे रस्त्यावर हातगाडीवर नाष्टा, चहा पिण्यासाठी गर्दी होत आहे. खरे तर व्यवसाय करण्यास प्रशासनाकडून काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. मात्र, रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते आणि उभे राहून खाद्यपदार्थ खाणारे खवय्ये कोणतीही अट पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य समस्या निर्माण होत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

सध्या बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरु केली. दंड वसूल करत आहोत. हातगाडी, पथारीवाले यांनाही सूचना देवू. तसेच पोलिसांसोबत पथक तयार करून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करू. शक्यतो. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थ पार्सल देण्यास काहीही हरकत नाही. लवकरच बोर्डाच्या वतीने सर्व्हेक्षण करू

-रामस्वरुप हरितवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅटोन्मेंट बोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT