aditi nikam
aditi nikam sakal media
पिंपरी-चिंचवड

कोरोनात भूकेल्यांना घास भरवून 'ती' देतीय आधार

रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी- कोरोनाचा (corona) संकटकाळ व मिनीलॉकडाऊनमुळे सर्वांचीच घडी विस्कळीत झाली आहे. यातच सर्वाधिक झळ कष्टक-यांना सोसावी लागत आहे. यात पदपथावरील विक्रेते ते बांधकाम मजूर कष्टकरी वर्ग पिचला आहे. अशा कष्टकरी वर्गासाठी विविध उपक्रम राबवत पिंपळे गुरव येथील आदिती निकम (aditi nikam) या छोट्या छोट्या सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदत करत दिलासा देण्याचे परिसरात काम करत आहेत. पदपथावर, चौकांमधून कॅरिबॅग विक्री करणा-यांसाठी स्वत: कॅरीबॅग विकून आलेले पैसे त्या गरजूंना देतात. तर परिसरातील कुणीही कष्टकरी उपाशी राहू नये यासाठी जिवनाश्यक शिधा,अन्नदान देत परिसरातील कष्टक-यांना आधार देत आहेत.

मातृदिनानिमित्त जुनी सांगवी येथील वेताळ महाराज उद्यान परिसरातील पत्राचाळ येथील राहणा-या कष्टक-यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टर,नाभिक कारागिरांना सोबत घेवून जात त्यांनी लॉकडाऊनच्या केशकर्तनालयावरील निर्बंधांमुळे वाढलेले केस व स्वच्छतेबाबत महत्त्व पटवून दिले. त्यांना मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे स्वच्छतेबाबत काळजी घेण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तर कोरोनामुळे केशकर्तनालय बंद असल्याने येथील केस वाढलेल्या बालकांची कारागिरांनी सर्व खबरदारी घेत कटिंग केली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात येथील आदिलक्ष ग्रुप, डॉ.चंदन लोखंडे, नाभिक कारागिर श्रावण सुर्यवंशी, शिवा काकडे यांनी या उपक्रमात योगदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT