पिंपरी-चिंचवड

एकच प्याला पडला महागात : पिंपरी-चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीची व्यथा

पीतांबर लोहार

पिंपरी : तो तिशीतला तरुण. पुण्यातील येरवडा परिसरात राहणारा. एक दिवस त्याला सर्दी झाली. खोकला येऊ लागला. दोनेक दिवसांनी ताप भरला. सारखा खोकू लागला. कुटुंबीयांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या तपासणीचा रिपोर्ट आला. कोरोना पाॅझिटीव्ह. उपचार सुरू झाले. पण, दोनच दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांसह संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला. धागा पिंपरी कॅम्पानजिकच्या एका वसाहतीत पोचला. कारण, या वसाहतीतील एका महिलेकडे तो ताडी प्यायला यायचा. त्या महिलेला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.

दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. कोरोना पाॅझिटीव्ह. आणि प्रशासन हादरले. कारण, या महिलेचे चार-पाचशे ग्राहक होते. वेगवेगळ्या भागातून ते 'तो' प्याला रिता करायले यायचे. त्यातील दोघांचा संदर्भ मिळाला, आनंदनगर. आणि महापालिका वैद्यकीय व आरोग्य विभागाचे पथक आनंदनगला पोचले. एक एक करत पाॅझिटीव्ह रुग्ण आढळू लागले. अवघ्या काही दिवसांत संख्या ८० वर पोचली. एकाच प्याल्याने आपली करामत दाखवत घात केल्याची जाणीव झाली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताडी विक्रेत्या महिलेच्या संपर्कातील दोघांना रुग्णालयात नेले. तपासणी केली. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडे तपासण्यासाठी पाठवले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले. दोन्ही पाॅझिटीव्ह. त्यांच्या कुटुंबीयांसह संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली. तेही पाॅझिटीव्ह. झोपडपट्टी परिसर. दाट लोकवस्ती. लोकसंख्येची घनता जास्त. त्यामुळे खबरदारी म्हणून पाॅझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची यादी तयार केली. त्यांना एका शाळेत क्वारंटाइन केले. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल केले आणि एकाच दिवशी सोमवारी, १८ मे रोजी १८ जणांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. 

पहिले दोन रुग्ण तेरा मे रोजी आढळले. तेव्हाच आनंदनगर परिसर सील केला. परंतु, अठरा मे रोजी अठरा जण पाॅझिटीव्ह आढळले आणि बंदोबस्त वाढविण्यात आला. कंटेंन्मेट झोनची कडक अंमलबजावणी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी, १९ मे रोजी शेकडो महिलांसह पुरुष घराबाहेर पडले. कामधंदा व पोटापाण्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अन्नधान्य व जेवणाचे काय? असा सवाल केला. पोलिसांनी आवाहन करूनही उपयोग झाला नाही. अखेर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर घटना स्थळी पोहोचले. त्यांनी समजूत घातली. अन्नधान्य व जेवणासाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करण्याचे सांगितले. सर्व शांत झाले. 

आनंदनगरची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी आसर्वांची कोरोना पूर्व चाचणी करण्याचे ठरविले. त्यासाठी मोबाईल लॅबची मदत झाली. दोन-अडीचशे नागरिकांची तपासणी करून ८२ संशयितांची यादी तयार झाली. सर्वांना वायसीएम व भोसरी रुग्णालयांत दाखल केले. घशातील द्रवाचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजीकडे तपासण्यासाठी पाठवले. शनिवारी रिपोर्ट आले. १९ पाॅझिटीव्ह. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या चार दिवसांत येथील बाधितांची संख्या वाढली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांसह सर्वांचीच कोरोना पूर्व तपासणी सोमवारी सकाळी दहा वाजेपासून मोबाईल लॅबद्वारे केली जाणार आहे. कारण, एकाच प्याल्याच्या संगतीने त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत कोरोनाने वाटचाल केली आहे. ती खंडित करून त्याच्यावर विजय मिळवून हिरावून घेतलेला आनंदनगरचा आनंद पुन्हा मिळवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कोरोना पूर्व तपासणी करून घ्यायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT