
Fadnavis’ Statement on Jarange Protest and Reservation Issue : यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरत आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे यावर्षी राज्यभरात गणेशोत्सव दरवर्षीपेक्षा अधिकच भव्यदिव्य स्वरुपात साजरा होताना दिसत आहे.
तर गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळ माध्यम समूहाच्या साम वृत्तवाहिनीच्या मुंबईतील बीकेसी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी 'साम'च्या कार्यालयात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. तसेच याप्रसंगी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरतीही करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे देखील उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. ‘’मला अतिशय आनंद होत आहे की सामच्या कार्यालयात विराजमान झालेल्या गणरायाच्या दर्शनासाठी आलो आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव आहे आणि गणेशोत्सव हा सामाजिक अभिसरणाचा महोत्सव आहे. समाजातील सर्व वर्ग यात सहभागी होतात. सर्वजण एकत्र येतात. एकत्रितपणे महोत्सव साजरा करतो. त्यातून एकीकरण होतं. नेतृत्व गुण तयार होतात. संघटनशक्ती तयार होते. अर्थातच या माध्यमातून आपल्याला एक अध्यात्मिक शक्ती मिळत असते.’’ असं फडणवीस म्हणाले.
याचबरोबर ‘’गणरायाकडे एकच मागणे मागायचे असते ते म्हणजे, मला आणि इतरांनाही सुबुद्धी दे. सर्वांना सुबुद्धी देऊन सन्मार्गाने चालण्याची शक्ती मिळावी. चांगल्या कार्याची सुरुवात ही श्री गणेशांपासून होते. सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य मिळू दे. सगळ्यांच्या आयुष्याची चांगली सुरुवात व्हावी, असे साकडे मी गणरायाला घालतो.’’, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘’लोकशाहीमध्ये मत-मतांतरे असतात. लोक आपल्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. आंदोलन हे त्यातील महत्वाचे अस्त्र आहे. चर्चेतून अनेक गोष्टी आपल्याला सोडवता येतात. आपण जर विचार केला तर मराठा समाजाचा इतका वर्षांच्या आंदोलनाचा इतिहास बघितला किंवा गेली ४०-४५ वर्षे सातत्याने आरक्षणाची मागणी होते. पण ही मागणी कधी पूर्ण झाली तर २०१४ ते २०२५ पर्यंत ज्या-ज्या वेळी आमचे सरकार आले त्यावेळी मराठा समाजाकरिता निर्णय घेण्यात आले.’’ असे ते म्हणाले.
तर ‘’याचे आरक्षण काढून त्याला आणि त्याचे आरक्षण याला द्यायचे आणि हे सगळे लढत राहिले की आपण आपला फायदा बघा, असे करणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मराठा समाजाचे त्यांच्याकडे आणि ओबीसी समाजाचे त्यांच्या पदरी राहिले पाहिजे, असाही आमचा प्रयत्न आहे. चर्चा सुरू आहे. प्रयत्न करू.’’ अशी भूमिकाही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.