पिंपरी-चिंचवड

'या' कारणामुळे मोशीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय

सकाळ वृत्तसेवा

मोशी (पुणे) : भाजी, फळे, किराणा खरेदीसाठी नागरिक एकाच वेळी करत असलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव व मास्क वापरण्याचा निष्काळजीपणा या कारणांमुळे मोशी उपनगरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

सुरुवातीच्या काळामध्ये लॉकडाउन अत्यंत कडक होता. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तामुळे सुरुवातीचे दोन महिने पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. त्या कालावधीत मोशी उपनगरातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नव्हता. मात्र, 1 जूनपासून सरकारने काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, लहान उद्योग, दारुची दुकाने आदी सुरु करण्यास परवानगी दिली. त्यातच जीवनावश्यकमध्ये मोडणाऱ्या किराणा, भाजी, फळे, दूध या व्यावसायिकांना आधीपासूनच सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी होती. त्यामुळे या ठिकाणी नागरिक तेव्हापासून आजही गर्दी करीतच आहेत. ही गर्दी करत असताना नागरिक कोणत्याही प्रकारे स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत. मास्क लावला असेल, तर तो फक्त तोंडावर असतो. वरचे नाक मोकळेच असते. सोशल डिस्टन्सिंगचा वापर, तर कधी करताना आढळूनही येत नाही. आणि सॅनिटायझर तर फक्त खिशात असते. मात्र, ते भाजी, किराणा, फळे घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर कधी लावताना दिसूनही येत नाहीत. हे किराणा, भाजी फळे विक्रेतेही कधी मास्क लावताना दिसत नाहीत. काही जण नुसता रूमाल नाकाला अडकवतात, तर काही नाक उघडे ठेऊन मास्क फक्त तोंडावर लावतात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोशी परिसरातील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती, मोशी श्री नागेश्वर महाराज मंदिर परिसरातील भाजी मंडई, भारत माता चौक, मोशी देहू रस्त्यावरील डि मार्ट, जाधववाडी लिंक रस्त्यावरील पदपथ, स्पाईन सिटी मॉल व्यापारी संकुल, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, राजा शिवछत्रपती चौक, जय गणेश साम्राज्य व्यापारी संकुल आदी गर्दीच्या ठिकाणच्या किराणा, भाजीपाला, फळे, हार्डवेअर, दवाखाने, बँका आदी ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक विविध कामांसाठी गर्दी करत असतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणे नागरिक गर्दी करत असल्यानेच आतापर्यंत संजय गांधीनगर, वुड्स व्हिले, नागेश्वर कॉलनी, गुरुविहार सोसायटी, शिवक्लासिक सोसायटी, जय गणेश साम्राज्य, सेक्टर नं 4, तापकीरनगर, डुडुळगाव आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील अनेक नागरिक बरे होऊन घरी परतले आहेत, तर काही उपचार घेत आहेत. मात्र, या संकटात सापडण्यापेक्षा नागरिकांनी जर काळजी घेतली तर या संकटापासून नक्कीच दूर राहता येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोशीकरांनी आपल्या या कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकामध्ये चार ते पाच फुट सोशल डिस्टन्सिंग, उत्तम दर्जाचा मास्क, सॅनिटायझर, कमीत कमी बोलणे, सोसेल एवढे गरम पाणी पिणे, अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडणे, बाहेरुन आल्यावर स्वच्छ आंघोळ करणे, शक्यतो घरातही सोशल डिस्टन्स पाळणे, हात धूत राहणे, बाहेरून आणलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू किमान वीस सेकंद डिटर्जंट पावडरणे धुणे, पादत्राणे घरामध्ये न घेणे, साधा, हलका व प्रतिकार शक्ती वाढेल असा आहार, जागरण न करता आवश्यक तेवढी झोप घेणे, आदी काळजी घेतल्यास आपण कोरोनापासून दूर राहू शकतो व रुग्ण संख्येला आळा घालू शकतो, असे मोशीतील एका डॉक्टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT