पिंपरी-चिंचवड

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा गावभर 'राउंड'; पुन्हा टेस्टसाठी आल्यावर आरोग्याधिकारी चक्रावले

सकाळवृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ, जि. पुणे) : दुपारी अडीच वाजताची वेळ. खडकाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात. रुग्णांची तपासणी औषधोपचारांसाठी लगबग. डॉक्टर नर्स आपल्या कामात व्यस्त. कोरोनाची माहिती अपडेट करून वरिष्ठ कार्यालयाला सादर करायची म्हणून फोनाफोन सुरू. जो-तो आपल्या कामात बिझी. रोज वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णसंख्येने प्रशासनावर काहीसा ताण. यावर उपाययोजनांबाबत त्यांचे खुलासे आणि प्रयत्न सुरू असतानाच. साहेब, परवा माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता मला कसला ही कशाचाही त्रास होत नाही. आज परत माझी कोरोना टेस्ट करा, असे सांगत एकजण आरोग्याधिकारी डॉ. अनिल गिरी यांच्या दालनाबाहेर उभा होता. 

टेस्ट परवा पॉझिटिव्ह आली आणि हा परत ही टेस्ट करायला आलाच कसा? या विचाराने डॉक्टर चक्रावले. त्यांनी त्या ‘महाशयां’ना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्याच तोऱ्यात. नागरिकांच्या बेफिकीरपणाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. तीन दिवसांपूर्वी टेस्ट केली हे महाशय पॉझिटिव्ह आहेत तरी आरोग्य केंद्रात दाखल. ते घरापासून दवाखान्यात येईपर्यंत आणि माघारी जाईपर्यंत किती जणांच्या संपर्कात आले असतील याचा विचार करणे गरजेचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य केंद्रात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, रुग्ण, आरोग्य कर्मचारी यांचे येणे-जाणे आलेच. माझी टेस्ट करा हे आरोग्याधिकाऱ्यांना सांगायला येण्यापूर्वी हा बहादर आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्याकडे जाऊन आला होता, ते ऐकत नाही म्हणून तो आरोग्यधिकाऱ्यांकडे आला होता. डॉ. अनिल गिरीने सुरुवातीला समजावून सांगितले, तोही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत दिसेना. तेव्हा त्याला चांगलेच सुनावले. कोरोना पॉझिटिव्ह असूनही गाव फिरणाऱ्या अशा बहाद्दराना कसा आळा बसवायचा. पण यासारखे अनेकजण आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह असतानाही बेफिकिरीने वागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT