PCMC Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : पॉझिटिव्हिटी दर घटेना; काही निर्बंध शिथिल

सूरज यादव

राज्य सरकारने पॉझिटिव्हिटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांची पाच गटात विभागणी केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यासह शहराचा समावेश तिसऱ्या गटात होतो.

पिंपरी - कोरोना संसर्गाचा ‘पॉझिटिव्हिटी दर’ शहरासाठी ऊन-सावलीचा खेळ खेळत आहे. कधी तो पाच टक्क्यांपेक्षा कमी असतो, तर कधी त्यापेक्षा अधिक आढळत आहे. त्यामुळे कोरोना अद्याप कमी झालेला नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, कोरोना संसर्ग विचारात घेऊन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी, सोमवारपासून काही अंशी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करूनच नागरिकांनी दैनंदिन व्यवहार करणे आवश्‍यक असल्याचे चित्र आहे.

तपासणीसाठी रुग्णालयात दाखल होणारे नागरिक आणि संसर्गाचा अहवाल पाहता शहराचा पॉझिटिव्हिटी दर दररोज बदलत आहे. गेल्या दहा दिवसांचा विचार करता केवळ तीनच दिवस तो पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला, तर सात दिवस पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. त्यातही दोन दिवस पॉझिटिव्हिटी दर सहा टक्क्यांपेक्षा अधिक राहिला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरावर काही प्रमाणात निर्बंध कायम राहिले आहेत. कारण, राज्य सरकारने पॉझिटिव्हिटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांची पाच गटात विभागणी केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यासह शहराचा समावेश तिसऱ्या गटात होतो. पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी व ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या कमी असती तर, आणखी निर्बंध शिथिल झाले असते.

आजपासून कसे? काय?

सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सवेव्यतिरिक्त अन्य दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील. वाचनालये, ग्रंथालये, स्पर्धा परीक्षा व खासगी शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था व मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर सोमवार ते शुक्रवारपर्यंतच ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सिनेमा व नाट्यगृहे पूर्णतः बंद राहतील. मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सुरू मात्र, रात्री ११ पर्यंत घरपोच सेवा असेल. रात्री १० नंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT