पिंपरी-चिंचवड

CoronaUpdate : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ७२८ नवे रुग्ण, तर चौघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ७२८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख १४ हजार ७५४ झाली आहे. आज ६७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख पाच हजार ९२९ झाली आहे. सध्या सहा हजार ९४५ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८८० आणि बाहेरील ७९० जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ६८ हजार २३४ जणांना लस देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत एक हजार ४३६ रुग्ण उपचार घेत आहेत. पाच हजार ५०९ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील एक हजार ६११ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील सहा हजार ३५१ जणांची तपासणी केली. ७०३ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख ४८ हजार ८३४ जणांचे विलगीकरण करण्यात आले. आज दोन हजार ९१९ संशयित रुग्णालयात दाखल झाले. तीन हजार २४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एक हजार ३१५ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार ४३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत सात लाख सात हजार ११२ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ९१ हजार ४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सहा लाख ९७ हजार ७७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या १४६ मेजर व ८९५ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. सोमवारी 'अ' क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात ९७, 'ब'मध्ये १०८, 'क'मध्ये ६५, 'ड'मध्ये १६८, 'इ'मध्ये ५५, 'फ'मध्ये ९३, 'ग'मध्ये ८८, 'ह'मध्ये ५४ असे ७२८ रुग्ण आढळले आहेत.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

Bengaluru Crime: बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह! आई आहे मानवाधिकार कार्यकर्ता

SCROLL FOR NEXT