पिंपरी-चिंचवड

पिंपरी : आनंदरनगरमधील रुग्ण शोधण्यात यांची भूमिका ठरतेय महत्त्वाची...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी Coronavirus : चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण संख्या वाढतच आहेत. त्यामुळे येथील रुग्ण शोधण्यासाठी संशयित व पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील रहिवाशांची मोबाईल लॅबद्वारे कोरोनापूर्व चाचणी घेण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करून घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले. 82 पैकी 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. 

चिंचवड रेल्वे स्टेशनलगत पन्नास वर्षांपूर्वी वसलेली झोपडपट्टी म्हणजे आनंदनगर. रोजंदारी हेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन. कोणी रिक्षावाला, तर कोणी हातगाडी, टपरीवाला. दाट लोकवस्ती. 13 मे राजी पहिला रुग्ण येथे आढळला. त्यानंतर रुग्ण वाढतच आहेत. आजपर्यंत येथील रुग्णसंख्या जवळपास 80 झाली आहे. गेल्या सोमवारी (ता. 18) एकाच दिवशी 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना एका शाळेत क्वारंटाइन करण्यात आले. शुक्रवारी (ता. 22) 19, शनिवारी (ता. 23) 15 आणि रविवारी (ता. 24) 17 रुग्ण आनंदनगरमधील आढळले आहेत. इतक्‍या मोठ्या संख्येने रुग्ण शोधण्यासाठी महापालिकेने कृष्णा डायग्नोस्टिकच्या सहकार्याने बुधवारी (ता. 20) सुरू केलेल्या मोबाईल लॅबचा उपयोग झाला आहे. याद्वारे कोरोनापूर्व चाचणी घेतली जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दोन दिवसांपासून आनंदनगर परिसरात मोबाईल व्हॅनद्वारे शिबिर आयोजित करून संशयितांची तपासणी केली जात आहे. रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण, ताप, सर्दी, खोकला अशी तपासणी केली जात आहे. अशी लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या घशातील नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॉयरॉलॉजीकडे (एनआयव्ही) तपासले जात आहेत. त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांवर उपचार सुरू आहेत. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन केले जात आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उद्या पुन्हा तपासणी

रविवारी मनुष्यबळाअभावी आनंदनगरला तपासणी करण्यात आली नाही. मात्र, एका कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांची तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. 25) सकाळी दहा वाजेपासून आनंदनगर येथील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT