Vasant Borate 
पिंपरी-चिंचवड

भाजपला धक्का दिल्यानंतर नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : मोशी-जाधववाडी प्रभाग दोनमधील भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी काल बुधवारी पदाचा राजीनामा दिला होता. आज गुरुवारी सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बोराटे हे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजपला खिंडार पडण्याची ही सुरुवात असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या उपस्थितीत बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोशी जाधववाडी प्रभाग तीनचे ते नेतृत्व करत होते. नवीन प्रभाग रचनेमुळे त्यांच्या भागाचा समावेश प्रभाग चारमध्ये झाला आहे. याच भागातील आल्हाट रहिवासी असून बोराटे यांच्या प्रवेशामागे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT