bjp.jpg
bjp.jpg 
पिंपरी-चिंचवड

मोठा गौप्यस्फोेट : भाजप म्हणतेय आमच्या नेत्याला खंडणीसाठी मारहाण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवक विलास मडिगेरी मारहाण प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. शहरातील जमिनी खाजगी वाटाघाटीने भूसंपादनाचा विषय वारंवार तहकूब ठेवणे व टक्केवारी यावरून मारहाणीची घटना घडल्याची चर्चा गेले दोन दिवस होती. मात्र, त्यात आता राजकारण दिसू लागले आहे. खंडणीसाठी मारहाण झाली असून पक्ष मडिगेरी यांच्या पाठीशी असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर, मडिगेरी यांना भाजपकडूनच धोका असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांना अडकवण्याचा भाजपचा डाव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे.

कोण आहेत मडिगेरी
महापालिकेत भाजपची सत्ता आली. त्या फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत भोसरी इंद्रायणीनगर प्रभागातून विलास मडिगेरी पहिल्यांदा निवडून आले. यापूर्वी दोन वेळा त्यांच्या सौभाग्यवतींनी या प्रभागाचे महापालिकेत नेतृत्व केले आहे. एका भाजप आमदारांचे ते कट्टर समर्थक आहेत. फेब्रुवारी २०१८ ते २०१९ या काळात ते स्थायी समिती सदस्य राहिले. फेब्रुवारी २०१९ ते २०२० या काळात ते स्थायी समिती सभापती झाले. 

आणि गालबोट लागले
कधी नव्हे ती पिंपरी चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. सव्वा तीन वर्षांचा कार्यकाल संपला. आता आगामी फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीची तयारी करायला हवी. पण, 'तीन तिघडा आणि काम बिघडा' अशी भाजपची अवस्था झाली आहे. ज्यांच्या जोरावर भाजपने महापालिका ताब्यात घेतली त्या आमदार द्वयींसह महापालिका सत्ताकारणात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा एक गट सक्रीय आहे. काहीही झाले तरी पक्षाला गालबोट लागता कामा नये यासाठी धडपडणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या आणि सध्या पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते दोघे कोण?
 स्थायी समितीच्या माजी सभापतींना स्थायी समितीच्याच दोन सदस्यांनी महापालिका भवनातच मारहाण केली आहे. हे दोन्ही सदस्य राज्य सरकारमधील दोन घटक पक्षांचे प्रतिनिधित्व करतात. यातील एका सदस्याचे शहर भाजपच्या बड्या नेत्याशी हाडवैर आहे. आणि ज्यांना मारहाण झाली ते नगरसेवक संबंधित भाजप पदाधिकाऱ्याच्या निकटवर्ती आहे. इतकेच नव्हे तर, त्या नेत्याच्याच इशा-यानुसार संबंधित नगरसेवकाने स्थायीवर असताना कारभार केल्याचे बोलले जात आहे. 
 अर्थात त्यांच्या पाठिराखे नेत्याची आहे. मात्र, अनेक वर्षे भूसंपादन रखडले आणि मोबदलाही मिळालेला नाही असे जमीन मालकांचे म्हणणे आहे. यावरूनच काल मारहाणीचे प्रकरण घडले, अशी चर्चा आहे. मात्र, हा वाद टक्केवारीवरून झाला असल्याचीही वंदता आहे. 

कधी व कुठे घडली घटना
सोमवारी महापालिका सर्वसाधारण सभा झाली. साधारणतः सहा तास सभा चालली. सभा संपल्यानंतर महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त जमले होते. या मजल्यावरच महापौर कक्ष, स्थायी समिती कक्ष व विरोधी पक्षनेता कक्ष आहे. पावणे सातच्या सुमारास स्थायी समिती कक्षातून आरडाओरडा ऐकू आला. सर्व जण तिकडे धावले. काय घडले, कोणालाच काही कळेना. संबंधित भाजप पदाधिकाऱ्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मारहाणीची कुजबुज ऐकू येऊ लागली.

राष्ट्रवादीचे पोलिस आयुक्तांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांना अडकवण्याचा भाजपचा डाव आहे. उलट भाजपकडूनच मडिगेरी यांना धोका आहे. मडिगेरी यांनी राष्ट्रवादी व शिवसेना नगरसेवकांना मारहाण करण्यास भाग पाडले. हा एक कटाचा भाग आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT