Vilas-Sonawane 
पिंपरी-चिंचवड

Video : कोरोनातून सावरुन मदतीला धावणारा अवलिया

प्रशांत पाटील

चीनच्या वुहान शहरातून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची भीती अजूनही कमी झालेली नाही. वर्षभरानंतरही आपली दहशत कायम ठेवणाऱ्या विषाणूनं आपल्याला खूप काही शिकवलंय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानं आपल्या सोबतच्या माणसांपासूनही खबरदारी घ्यायला शिकवलं. त्यातून आपण सावरत आहोत. पुढच्या काही दिवसांत आपण 100 टक्के या संकटातून बाहेरही पडू. पण या काळात निर्माण झालेली परिस्थिती भविष्यकाळातही निवळणार नाही. संकटाच्या काळात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या ज्यामुळे ऊर्जा नेमकी कशी असावी, याची प्रचिती आली. पिंपरीतील विलास सोनवणे हा अवलिया यांपैकी एक उदाहरण ठरला.

देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर राज्यातील पुणे-मुंबई कोरोनाचं केंद्र बनलं होतं. याच काळात विलास सोनवणे यांचे संपूर्ण कुटुंबिय कोरोनाच्या जाळ्यात अडकले. विलासही त्याला अपवाद राहिले नाहीत. योग्य ती खबरादारी आणि सरकारी नियमावलीचे पालन करत सुदैवाने सोनवणे कुटुंबिय यातून बाहेर पडले. याच काळात कोरोनातून बरे झालेल्या मंडळींकडून प्लाझ्मा दान करण्याची मागणी वाढली. ज्याला कोरोना झाला आहे त्याच्या अँटिबॉडीज दुसऱ्या कोरोनाग्रस्ताला बरे करण्यासाठी उपयुक्त ठरत होत्या. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या लोकांना प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन करण्यात येत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे मनात निर्माण झालेल्या दहशतीनंतर प्लाझ्मा डोनेट करायला पुढे सरसावणे हे धाडसाचेच काम होते. हे धाडस विलास यांनी करुन दाखवले. सामाजिक भान जपण्यासाठी त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर 18 दिवसांनंतर त्यांनी पुन्हा प्लाझ्मा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालय गाठले. यासंदर्भात विलास सोनवणे यांनी सकाळ ऑनलाईनशी खास मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या.

ते म्हणाले की, सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा प्लाझ्मा डोनेट केला. 18 दिवसांनी पुन्हा या प्रक्रियेला सामोरे गेलो. गड-किल्ले, ट्रॅकिंग आणि व्यायाम यामुळे शरीर तंदुरुस्त होते. त्यामुळेच कदाचित संकटातून सावरुन प्लाझ्मा दान करण्यासाठी बळ मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  प्लाझ्मा दान केल्यामुळे अशक्तपणा येतो, असा घरच्यांचा समज होता. त्यांचा प्लाझ्मा दान करण्याला विरोध होता. त्यामुळे मला त्यांना न सांगताच ही गोष्ट करावी, लागली, असेही त्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT