पिंपरी-चिंचवड

पिंपरी : मुष्टियोद्ध्यांमध्ये 'शॅडो बॉक्‍सिंग चॅलेंज'ची क्रेझ

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मुष्टियुद्ध खेळामध्ये एकमेकांना ठोसे मारणे आलेच...मात्र, सध्या कोणतीही स्पर्धा होत नसल्याने खेळाडूंमध्ये "शॅडो बॉक्‍सिंग चॅलेंज'ची क्रेझ निर्माण झाली आहे. अर्जुन पारितोषिक विजेते गोपाळ देवांग यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडूंनी हे चॅलेंज स्वीकारत "शॅडो बॉक्‍सिंग' केली आहे. 

भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने (बीएफआय) खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती टिकवून रहावी आणि खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी हे चॅलेंज दिले आहे. त्याला शहरातील अनेक खेळाडूंनी प्रतिसाद दिला आहे. अर्जुन पारितोषिक विजेते माजी मुष्टियोद्धे गोपाळ देवांग यांनी खेळामधून निवृत्त झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथमच "शॅडो बॉक्‍सिंग'चे चॅलेंज स्वीकारले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देवांग म्हणाले,"माझ्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. 1992 नंतर 4 ते 5 वर्षे शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी सराव करत होतो. मात्र, शॅडो बॉक्‍सिंग चॅलेंज हे अनेक वर्षांनी स्वीकारले आहे. नेहरुनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या आवारात मी "शॅडो बॉक्‍सिंग' केले. यामध्ये, खेळाडूंचा एकमेकांना स्पर्श होत नाही.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीचे मुष्टियुद्ध प्रशिक्षक ऋषिकांत वचकल म्हणाले,"भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने (बीएफआय) यापूर्वी 31 मे पर्यंत हे चॅलेंज खेळाडूंना दिले होते. मात्र, नंतर परत त्याची मुदत वाढवून देण्यात आली. यामध्ये खेळाडूंनी त्यांच्या शॅडो बॉक्‍सिंगची 30 सेकंदांची व्हिडिओ क्‍लिप संघटनेकडे अपलोड करायची आहे. या चॅलेंजमध्ये बॉक्‍सिंग रिंगची आवश्‍यकता नाही. काही खेळाडू ग्लोव्हज्‌सह तर काही ग्लोव्हज्‌शिवाय हे चॅलेंज स्वीकारले आहे. प्रबोधिनीच्या 40 ते 45 खेळाडूंनी शॅडो बॉक्‍सिंग केले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या चॅलेंजमध्ये आतापर्यंत शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, मनोज इंगवले, माजी राष्ट्रीय खेळाडू रघुनाथ खेडेकर, पिंपरी-चिंचवड मुष्टियुद्ध संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काकडे या माजी खेळाडूंनी भाग घेतला आहे. तर नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विवेक मंडल, रुपेश वचकल, जीवा कांबळे, शैलेश पाटील, चित्रा रोकडे, पूजा थोरात, ज्ञानेश्‍वरी तापकीर, अभिषेक जाधव आदी खेळाडूंनी हे चॅलेंज स्वीकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT