पिंपरी-चिंचवड

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल; चिखलीतील घटना 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आपला भ्रष्ट कारभार उघड होऊ नये, म्हणून कंपनीत काम करणाऱ्या सात जणांनी मिळून त्यांच्यासोबतच्या कामगाराला वेळोवेळी मानसिक त्रास देत त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार चिखली येथे घडला. अनुप अप्पासाहेब उदगावे (वय ३८, रा. पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा भाऊ किशोर अप्पासाहेब उदगांवे (रा. मिरजगांव) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

याप्रकरणी प्रसाद मेमन, गुंडेपल्ली राधाकृष्ण, गणेश डोंगरे, अरविंद चौगुले, श्रीधर रामलिंगम, आदर्श सहाय, भोगशेट्टी हरिहरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही घटना थायसन क्रूप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पिंपरी व पोलाईट हॅमिटेज शिवतेजनगर, चिंचवड येथे घडली. आरोपी सर्वजण कंपनीत भ्रष्टाचार करत असल्याची माहिती अनुप यांना होती. त्यामुळे आरोपी त्यांना त्रास देत होते. अनुप यांना दूरच्या साइटवर पाठवून त्यांना त्रास द्यायचे. तसेच, ते गावी गेल्यानंतर साइटवर येण्यासाठी फोन केल्यास गावावरून ते येऊ नयेत, म्हणून त्यांचे फोन उचलत नव्हते.

त्यांच्याशी वेळोवेळी कटकारस्थान करून त्यांच्या कामात अडथळा आणला. आरोपी गुंडापल्ली राधाकृष्ण याने अनुप यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अनुप यांनी शनिवारी (ता. २०) राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बलाढ्य भाजपलाही दगाफटक्याची भीती; 'शिट्टीच्या' धसक्याने तब्बल 43 नगरसेवक अज्ञातस्थळी

DMart नव्हे, आता 'She Mart'! महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! 3 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत, कन्यासह ‘या’ 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा, शिंदे सेनेची मागणी

SCROLL FOR NEXT