तिहेरी तलाक  sakal
पिंपरी-चिंचवड

बेकायदेशीर तलाक : तिघांवर गुन्हा

सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पैसे व मोटार न दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पती शोएब अथर सिद्दिकी (वय ३६), सासरा अथर सिद्दिकी (वय ७२), सासू (वय ६५, सर्व रा. भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (PCMC News)

याप्रकरणी पीडित विवाहितेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित विवाहिता व आरोपी शोएब यांचे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला. पैसे, मोटार न दिल्याने पतीने विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. तसेच विवाहितेचे स्त्रीधन परत केले नाही. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Ramadan 2026: रमजानमध्ये इबादत, शांती आणि सवाबाचा अनुभव घ्यायचा आहे? भारतातील 'या' मशिदींना नक्की भेट द्या

Latest Marathi News Live Update : सोलापुरातील मोहोळ मध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT