Crime sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri Crime : विवाह मान्य नसल्याने दाजीचा खून; मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली

बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून, भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून, भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर डिझेलने मृतदेह जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी हाडे व राख पोत्यात भरून नदीत टाकून दिले. ही धक्कादायक घटना मोशीतील आदर्शनगर येथे घडली. याप्रकरणी विवाहितेचा सख्खा भाऊ, मेहुण्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, एक चुलत भाऊ फरार आहे.

अमीर महम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ - राधे, ता. पारनेर, जि. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर त्याचा साडू पंकज विश्वनाथ पाईकराव (वय २८, रा. मार्तंडनगर, चाकण, मूळ - भिंगे आडगाव, जि. हिंगोली), सख्खा मेहुणा सुशांत गोपाळा गायकवाड (वय २२, रा. राधे, ता. पारनेर, जि. नगर) आणि सुनील किसन चक्रनारायण (वय ३३, रा. मोई रोड, चिंबळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चुलत मेहुणा गणेश दिनेश गायकवाड (रा. राधे, ता. पारनेर जि. नगर) हा फरार आहे.

मृत अमीर व आरोपी सुशांतची बहिण यांचा सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघेही मोशी येथे राहत होते. मात्र, हा विवाह अमीरच्या सासरच्या लोकांच्या मनाविरुद्ध झाला होता. अमीर हा १५ जूनला कंपनीत कामाला जातो, असे सांगून गेला. तो परत घरी न आल्याने अरीना अमीर शेख हिने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती.

यात अमीरला त्याचा साडू पंकज याने फोन करून बोलावून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी पंकजला २१ जूनला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.

आरोपींनी आमीरला दारू पिण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर मेदनकरवाडी हद्दीतील जंगलात ते दारू पित बसले. त्यावेळी सुशांत व गणेश यांनी आमीरला जंगलात ओढत नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT