Crime News Police sub-inspector demanded bribe Anti-corruption department action sakal
पिंपरी-चिंचवड

Crime News : पोलिस उपनिरीक्षकाने मागितली लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

रोहित डोळस (वय ३१) असे लाच मागणाऱ्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात एक तक्रारी अर्ज दाखल आहे. त्या अर्जावरून तक्रारदाराच्या भावास आरोपी न करण्यासाठी तसेच प्राप्त झालेला अर्ज हा दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी डोळस यांनी तीन लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती दोन लाख रूपयांची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता डोळस हे लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT