पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

वाहनाच्या धडकेत
पादचारी तरुण जखमी
पिंपरी : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना भांबोली ते वराळे रस्त्यावर घडली. शक्तिमान चंद्रिका प्रसाद (वय १९, रा. भांबोली) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे पायी घरी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाला.
------------------
आर्थिक फायद्याचे आमिष दाखवत
दोन लाखांची फसवणूक
ऑनलाइन जॉब केल्यास आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून एकाची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तळेगाव, विद्याविहार कॉलनीतील ३२ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉसलीन नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. ऑनलाइन जॉब केल्यास अधिकच्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीची दोन लाख दोन हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली.
----------------------------------------------
कोयता बाळगल्याप्रकरणी
एकाला अटक
तळवडे : बेकायदा कोयता बाळगल्याप्रकरणी एकाला निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई तळवडे, शरदनगर येथील कृष्णानगर झोपडपट्टी येथे करण्यात आली. सुजल उत्तरेश्वर पोटभरे (वय २०, रा. कृष्णानगर झोपडपट्टी, शरदनगर, तळवडे) असे आरोपीचे नाव आहे. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------
बेकायदा दारूविक्री
प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : बेकायदा दारू विक्रीप्रकरणी राहुल फुलचंद नट (वय २३, रा. वाकडकर वस्ती, वाकड) याच्यावर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT