crime sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत टोळक्याकडून तरुणावर चॉपर, कोयत्याने वार

कोयता हवेत भिरकावून माजवली दहशत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणाबाबत सर्वाना सांगतोस काय, असे म्हणत टोळक्याने तरुणावर चॉपर व कोयत्याने वार केले. मोठमोठ्याने शिवीगाळ करीत कोयता हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी राहुल बापूराव टोणपे (रा. सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत , मिलिंदनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल पवार (वय ३१, रा. पिंपरी), अक्षय येलवे (वय २१) यांना पोलिसांनी अटक केली आहेत. तर तन्वीर युसूफ शेख -घोडेवाला (वय २८, रा. काळेवाडी ), अतुल पवार (वय २८, रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी हे बुधवारी (ता. २०) रात्री साडे नऊच्या सुमारास मिलिंदनगर येथील एफ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभे होते. त्यावेळी 'काही दिवसांपूर्वी झालेली भांडणे सर्वाना सांगतोस काय' असे म्हणत आरोपीने त्यांना शिवीगाळ करीन धमकावले. कोयता, चॉपर व बांबूने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर मोठमोठ्याने शिवीगाळ करीत हातातील कोयता भिरकावून 'जर कोणी सोडविण्यास मध्ये आला तर त्याला सुद्धा खल्लास करतो' असे धमकावून दहशत माजवली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

'अरे हा तर आजोबा राजेश खन्नासारखा दिसतो' अक्षय-ट्विकलचा मुलगा आरवला पाहून चाहते शॉक, Viral Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Air India Pilot Alcohol Test : एअर इंडियाचा वैमानिक दारू पिऊन विमानात, झ्युरिच विमानतळावरील उड्डाणापूर्वीची घटना, थेट केलं निलंबन

SCROLL FOR NEXT