Crime_Cyber_Attack 
पिंपरी-चिंचवड

Cyber Attack : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला; हल्लेखोरांनी मागितली बिटकॉइनची खंडणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तब्बल २७ सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करून सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. यासह डेटा पूर्वपदावर आणण्यासाठी बिटकॉइनची खंडणी मागितल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी (रा. हडपसर, वय ५५) यांनी याबाबत निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाची सर्व्हर रूम निगडी, प्राधिकरण येथील अस्तित्व हॉल येथे आहे. येथे या प्रकल्पात टेक महेंद्रासह तीन कंपन्या काम करतात. येथील सर्व्हरवर हा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. २७ सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२१ ला घडला असून याप्रकरणी ९ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच हा डेटा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अज्ञातांकडून बिटकॉइनची खंडणी मागितल्याचे पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुंगार यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT