वडगाव मावळ : मावळ तालुक्यात बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे फुलशेतीचे (पॉलिहाऊस) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फुलउत्पादकांना वादळाने दुहेरी संकटात टाकले आहे.
बुधवारी सकाळपासून संपूर्ण मावळ तालुक्यात निसर्ग चक्री वादळाचा प्रभाव जाणवत आहे. जोरदार वादळी वारे सुरु आहे. त्यात अनेक झाडांची पडझड झाली आहे. घरे व शाळांवरील पत्रे उडून गेले आहेत. स्वागत कमानी व जाहिरात फलकांचे सांगाडे कोलमडून पडले आहेत. नाणे, आंदर, पवन मावळसह आंबी जवळच्या तळेगाव फ़्लोरीकल्चर पार्क अशा विविध ठिकाणच्या फुलशेतीच्या पॉलिहाऊसला त्याचा मोठा फटका बसला आहे. पॉलिहाऊसचे पॉलिथिलीन पेपर फाटले आहेत, तर काहींचे उडून गेले आहेत. काहींच्या पॉलिहाऊसचे सांगाडे वाकले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मावळ तालुक्यात सुमारे बाराशे एकर क्षेत्रावर सुमारे तीनशे शेतकरी फुलशेती करत आहेत. अनेक तरुण शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून पॉलिहाऊस उभारले आहेत. १४ फेब्रुवारीचा व्हॅलेन्टाईन डे पार पडल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात हा व्यवसाय सापडला. मागणी नसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता वादळी वाऱ्यामुळे ते आणखी संकटात सापडले आहेत. प्रचंड वाऱ्यामुळे जवळ जाऊन व्यावसायिकांना नुकसानीचा अंदाज घेता आलेला नाही. वादळ शांत झाल्यानंतर कोणा कोणाचे किती नुकसान झाले याची कल्पना येईल अशी माहिती पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे व तळेगाव फ़्लोरीकल्चर पार्क फुल उत्पादक संघाचे सचिव मल्हार ढोले यांनी दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.