modi 
पिंपरी-चिंचवड

शिळा मंदिर केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे सांस्कृतीक भविष्य घडणारी संस्था - PM मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण पार पडलं

सकाळ डिजिटल टीम

देहूतील संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर हे केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर सांस्कृतीक भविष्य घडवणारं मंदिर आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देहू इथं शिळा मंदिराचं उद्घाटनं पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी पारं पडलं यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. (Dehu Tukaram Maharaj Shila Mandir an institution of cultural future PM Modi)

मोदी म्हणाले, आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. यामध्ये संतांचा सहवास लाभला की ईश्वराचं दर्शन आपोआप होतं. देहूच्या पवित्र भूमित आल्याचं मला सौभाग्य लाभलं त्यामुळं मी देखील याची अनुभूती घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या शिलान्यासाची संधी मिळाली.

पालखी मार्गांचं काम आठ टप्प्यात पूर्ण होणार

काही महिन्यांपूर्वीच मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय मार्गांना चार लेन करण्याच्या भूमिपूजनाची संधी मिळाली होती. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची सुरुवात पाच टप्प्यात होणार. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम ३ टप्प्यात पूर्ण होईल. या सर्व टप्प्यात ३५० किमीहून अधिक लांबीचे महामार्ग बनतील. यासाठी ११ हजार कोटींहून अधिक खर्च केला जाईल. या प्रयत्नांमुळं या भागातील विकासाला चालना मिळेल, असं मोदी यावेळी म्हणाले.

PM मोदी पुढे म्हणाले, आज सौभाग्यानं शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मला देहूत येण्याचं सौभाग्य लाभलं. ज्या शिळेवर स्वतः तुकाराम महाराजांनी १३ दिवस तपस्या केली. जी शिळा तुकाराम महाराजांच्या वैराग्याची साक्षीदार होती. त्यामुळं ही केवळ शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचं आधारशिला आहे. देहूचं शिळा मंदिर केवळ भक्ती-शक्तीचं केंद्र नव्हे तर भारताच्या सांस्कृतीक भविष्याला देखील प्रशस्त करतं. या पवित्र स्थानाच्या पुननिर्माणासाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचं हृदयातून आभार व्यक्त करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : वातावरण खराब असल्यामुळे...! मोदींनी सांगितलं मणिपूरला उशीरा पोहचण्याचे कारण...

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Movie Review : दशावतार - प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्यागाची उत्तम गुंफण

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

SCROLL FOR NEXT