पिंपरी-चिंचवड

देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाने दिले सर्व विभागप्रमुखांना हे पत्र...

सकाळ वृत्तसेवा

देहू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या उद्योगधंदे बंद आहेत. तर सरकारी कार्यालयातही कामकाज बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आर्थिक परिस्थिती नाजूक होत असून, कामगारांना पगार करण्यासाठी प्रशासनाकडे पैसे शिल्लक नाहीत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाची सध्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, चालू मे महिन्याचा पगार होतो की नाही ,अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने आपल्या सर्व विभागातील प्रमुखांना मे महिन्याचे वेतन होणार नाही. त्यामुळे जवळील शिल्लक असलेली रक्कम जपून वापरा, असे लेखी पत्र दिलेले आहे. जीएसटी लागू झाल्याने केंद्राने अद्याप कँटोन्मेंट बोर्डाला जीएसटीची रक्कम दिलेली नाही. त्यातच लष्कराच्या विविध विभागाकडूनही सेवाकराची रक्कम बोर्ड प्रशासनाला मिळालेली नाही. सध्या बोर्डाचे उत्पन्न वाहन प्रवेशकरातून मिळत होते. मात्र, दोन महिने होत आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महामार्गावरील वाहने बंद असल्याने त्यातून मिळणारे वाहन प्रवेशकराचे पैसेही मिळत नाही. एकूणच बोर्डाच्या तिजोरीत खणखणाट झालेला आहे. या बाबत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी बोर्डाच्या सर्व विभागांना पत्र लिहिले आहे. त्यात बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यामुळे मे महिन्याचा पगार हा वरिष्ट पातळीवरून अनुदान आल्यानंतरच होऊ शकतो. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील कामगारांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी. तसेच बचत करण्याचे संकेत द्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT