Anushka Sathe sakal
पिंपरी-चिंचवड

Motivation News : दिल्लीतील पथसंचलनासाठी अनुष्काची निवड

सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र अनुष्का सचिन साठे हिची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी - सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची छात्र अनुष्का सचिन साठे हिची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्रातून १२२ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे ग्रुपमधून २९ कॅडेटची निवड झाली असून, त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनच्या १५ कॅडेटची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यात अनुष्का ही बाबरावजी घोलप महाविद्यालयाची व २ महाराष्ट्र बटालियन एनसीसीची छात्र आहे.

राष्ट्रीय पथसंचलनासाठी निवड होणे महाविद्यालयाच्यादृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी व्यक्त केले आहे.

संचलनासाठी मला संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे. खूप सरावानंतर ही संधी मला मिळाली आहे. त्यामुळे माझे व माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे अनुष्का हिने सांगितले.

शहरात एकमेव एनसीसी युनिट

एनसीसी युनिट महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१६ मध्ये सुरू झाले असून, अनेक छात्रांची सैन्यदल, पोलिसदल व अग्निशामक दलात निवड झाली आहे. आतापर्यंत पाच छात्रांची कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होत असलेल्या पथसंचलनासाठी निवड झालेली असून, आमच्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे, अशी माहिती एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT