पिंपरी-चिंचवड

बापरे! भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने रुग्णालयाकडे मागितले 25 लाख

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पीए बोलतोय, असा फोन करून कोरोना महामारीमुळे गोरगरिबांना मदत करण्यासाठी रुग्णालयाकडे 25 लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथील एका खासगी रुग्णालयात घडला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीकृष्ण गंगाधर जोशी (रा. निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, निगडी पोलिसांनी संबंधित मोबाईलधारक व्यक्तीविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 18 जुलैला जोशी यांच्या मोबाईल क्रमांकावर एकाने कॉल केला. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पीए सावंत बोलतोय, असे सांगितले. कोरोनाच्या महामारीमुळे गोरगरीब लोकांना मदत करायची आहे. त्यासाठी 25 लाख रुपये ताबडतोब आमच्या कार्यालयात पाठवून द्या, अशी धमकी दिली. जोशी यांनी तातडीने निगडी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: ''मी पक्ष सोडलेला नाही...'', शिवसेनेकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर काय म्हणाले? शिंदेंनी सांगितली तांत्रिक बाजू

Police Officer Transfer: पोलीस खात्यात मोठी उलथापालथ! १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती; तातडीने रुजू होण्याचे आदेश

Shashank Singh : आचाऱ्याला मारहाण प्रकरणाला नवं वळण! PBKS च्या फलंदाजाने मौन सोडले; म्हणाला, तो आचारी नव्हताच...

लग्नानंतर जोडीदाराने चीट केलं तरीही माफ करायचं... राम कपूरचं धक्कादायक वक्तव्य, आकांक्षा चामोला संतापली, म्हणते-

Aditya Thackeray On Sachin Ahir : सचिन अहिर शिंदे सेनेत जाताच आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, 'काय कमी केलं'

SCROLL FOR NEXT