

Aditya Thackeray On Sachin Ahir mumbai
esakal
Sachin Ahir vs aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या घडामोडीनंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्यावर तसेच भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.