Dog Sakal
पिंपरी-चिंचवड

श्वानांसाठी पाळणाघरांची मागणी वाढतेय

काही श्वान हे स्वभावाने रागीट किंवा अनोळखी व्यक्तीवर हल्ला करणारे असतात, तर काही खूपच प्रेमळ असतात. अशा विविध स्वभावाच्या श्वानांसोबत पाळणाघरात राहावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - धकाधकीच्या जीवनामुळे श्वानप्रेमींना (Dog) त्यांची देखरेख ठेवणे अवघड झाले आहे. सतत कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर पडावे लागते. तसेच विदेशात जाण्यासाठी, सणवार उत्सवात किंवा पर्यटनाला जाताना लाडक्या श्वानाला ठेवायचा कोठे हा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशावेळी कुत्र्यांना पिक अप-ड्रॉप सेवा, चांगल्या प्रतीचे डॉग फूड, खेळण्यासाठी एैसपैस जागा, जलतरण तलाव, कुलर, व्यायामाची सुविधा, औषधोपचार व वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. त्यामुळे श्वानांना होस्टेलमध्ये म्हणजेच त्यांच्यासाठी असणाऱ्या पाळणाघरांची (dog creche) मागणी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

काही श्वान हे स्वभावाने रागीट किंवा अनोळखी व्यक्तीवर हल्ला करणारे असतात, तर काही खूपच प्रेमळ असतात. अशा विविध स्वभावाच्या श्वानांसोबत पाळणाघरात राहावे लागते. श्वानांना रोज किमान एक तास व्यायाम हवा असतो. त्यामुळे, त्यांचे स्वास्थ्य निरोगी आणि स्वभाव शांत राहणे आवश्यक आहे.

करमणुकीच्या ठिकाणी चित्रपटगृहे, मॉल, हॉटेलमध्ये श्वानांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे, श्वान प्रेमींना अशा ठिकाणांचा आनंद घेता येत नाही. अशावेळी डॉगसाठी लागणाऱ्या घरांची अमूल्य मदत होते. श्वानांच्या मानसिकतेत देखील पाळणाघराच्या ठिकाणी भरपूर परिणाम जाणवत आहेत. मानसिकदृष्ट्या ते ताणतणावातून सावरण्यास मदत झाल्याचे पाळणाघर मालकांनी सांगितले.

लहान श्वान असेल तर त्यांना प्रिय असणाऱ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे कपडे ठेवून घेतले जात आहेत. त्या कपड्यांना कुटुंबातील सदस्यांचा वास असतो. त्यामुळे त्याला सुरक्षित वाटते. काही श्वान आक्रमक होतात. कोणालाच जवळ येऊ देत नाहीत. अशावेळी प्रशिक्षक श्वानांबरोबर खेळतात. त्यांच्याशी दोस्ती करतात. मग हळूहळू ते रुळतात. जेवतात. श्वान मालकांकडून त्यांच्या आवडी निवडी विचारून फॉर्म भरून घेतला जातो. मात्र, सहा महिन्यांपेक्षा जास्त कोणताही श्वान ठेवून घेतला जात नाही. बऱ्याच श्वानांची वैयक्तिक देखभाल केली जाते. अनेक श्वान हे शाकाहारी असतात. त्यामुळे, त्यांचे नियमित वेळा बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

निगा कशी राखली जाते

होस्टेलमध्ये श्वानांना सामाजिक होण्याची संधी मिळते. जे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण श्वान हे सामाजिक आहेत एकटे राहाणे हा त्यांच्या मूळ स्वभाव नाही, तिथे श्वानांना वेळोवेळी जेवण आणि व्यायाम दिला जातो. इतर म्हणजेच कोंब करणे, अंगावर होणारे पिसू किंवा इतर परजीवींपासून सुरक्षित ठेवले जाते. कोरोना काळात बरेच श्वान होस्टेलमध्ये काळजीपोटी ठेवले गेल्याचे डॉग होस्टेल चालकांनी सांगितले.

कोणत्या जातीचे श्वान ठेवले जातात

श्वान हा कुठल्याही जातीचा असेल तरीही तो होस्टेलला राहू शकतो. बिगल, शीत्सझू, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, लॅब्रॉडॉर, ल्हासा ॲप्सो, पूडल, पिटबूल, ग्रेट डेन, बॉक्सर, हाउंडस, टेरिअर, डॉबरमॅन.

काय आहेत अडचणी...

  • आक्रमक कुत्र्यांची भीती

  • केअरटेकरला इजा पोहचण्याची भीती

  • पिट बुल, रॉटविलर, तिबेटिअन श्वान आक्रमक असल्याने अधिक काळजी आवश्यक

  • पशुसंवर्धन तज्ज्ञांची गरज

  • आहारानुसार राइस, मांसाहार, पॅक फूड देणे गरजेचे

  • श्वांनाच्या बाबतीत सर्वसामान्यांना पुरेसे ज्ञान नसल्याने काही प्रशिक्षक, केअर टेकर्सकडून श्वानांची फसवणूक होण्याची भीती

गावाकडे अकोल्याला आलो होतो. माझ्या सिंबाचा लसीकरण अहवाल घेतला. एक वर्षाचा शित्सझू आहे. हिंजवडी माणगावला ठेवले आहे. श्वानाला काही रिॲक्शन आहे का, त्याची तपासणी करून घेतली.

- पंकज शेगावकर, श्वानप्रेमी, रावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT