pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri : शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा उघड

कित्येक शाळांमधील विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद झाली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरून संचमान्यता ३० सप्टेंबरपर्यंत केली जात असते. मात्र साइटलाच ‘एरर’ आल्यामुळे नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी रात्रंदिवस ऑनलाइन बसण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली. दुसरीकडे शिक्षण विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे कित्येक शाळांमधील विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद झाली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

सरकारच्या शालेय विभागाच्या सूचनेनुसार ३० सप्टेंबरपर्यंत शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ग्राह्य धरून संचमान्यता करणे आवश्‍यक होते. मात्र महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अनियोजनामुळे वेळेत टॅब उपलब्ध झाले नाहीत. शेवटच्या दिवशी टॅब पाच तासांसाठी उपलब्ध झाला, पण साइटलाच ‘एरर’ आल्यामुळे कित्येक शाळांची नवीन विद्यार्थ्यांची विद्यार्थी पोर्टलवर नोंद झालेली नाही. नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. या प्रकाराबाबत तक्रारी अनेक शिक्षक करीत आहेत.

अन्यथा शिक्षक ठरतील अतिरिक्त

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले आहेत. प्रत्यक्षात वर्ग सुरू नसले तरीही ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शासनाने सुरू केलेल्या पोर्टलवर शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विद्यार्थी पोर्टलमध्ये भरण्यात येते. यासाठी सरकारच्या पोर्टलचे नियंत्रण विभागस्तरावर केले जात असते. नवीन टॅब उपलब्ध करून दिल्याशिवाय इयत्ता दुसरीपासून पुढील इयत्तेतील विद्यार्थी संख्या अद्ययावत करता येत नाही.

परराज्यांतून आलेले विद्यार्थी, वयानुरूप प्रवेश घेतलेले विद्यार्थी किंवा पोर्टलवर नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंद करता येत नाही. विद्यार्थी पोर्टलवर असलेल्या विद्यार्थी संख्येवरून शासनाच्या वतीने शाळांची पटसंख्या निश्चित केली जाते. पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यार्थी लाभाच्या योजना दिल्या जातात. तसेच शिक्षक व शिक्षकेतर संचमान्यता करण्यात येत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT