पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरव, सौदागरात विकासकामांना सुरुवात 

मिलिंद संधान

नवी सांगवी ( पुणे ) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांना सुरुवात झाली असून, त्यामुळे आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांना दिलासा मिळाला आहे. 

गेल्या सव्वा महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे सर्वच कामे ठप्प असल्याने परप्रांतीय मजुरांसह मराठवाडा व विदर्भातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचा ओढा गावी परतण्याकडे होता. परंतु,महापालिकेच्या आयुक्तांनी शहराच्या विकासात नागरिकांचे असलेले योगदान व या मजुरांच्यादृष्टीने सकारात्मक विचार स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपळे गुरव व पिंपळे सौदागरात स्मार्ट सिटीअंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये डीपी रस्त्यांचे काँक्रीटीकरण व जमिनीखालून जाणाऱ्या पिण्याचे पाणी, सांडपाणी व पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांची कामे सुरू होती. या परिसरात बहुतांश डीपी रस्ते जेसीपीच्या सहाय्याने खणले होते. 

दीर्घायुषी टिकणारे हे रस्ते बांधणीला वेळ लागत होता, त्यातच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउन झाल्याने या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली. आता पावसाळा तोंडावर असताना ही कामे उरकली नाही, तर पावसाळ्यात याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे महापालिकेने या स्मार्टसिटीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्मार्ट सिटी प्रवक्ता विजय भोजणे म्हणाले, "लॉकडाउनचे सर्व नियम पाळून ठेकेदार व त्याचे मजूर काम करणार आहेत. सध्या काही तास सोडले, तर रस्त्यावर नागरिकांची वर्दळ व वाहतूक नसते. याचा फायदा काम करणाऱ्या ठेकेदाराला होईल. जास्तीत जास्त काम मशिनच्या माध्यमातून केले जाईल. जर आता काम सुरू केले नसते, तर मजूर आपापल्या गावी परतण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे दिवाळीपर्यंत कामे सुरू करणे अवघड झाले असते. परिणामतः पावसाळ्यात नागरिकांना याचा मोठा फटका बसला असता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT