पिंपरी-चिंचवड

फडणवीसांच्या ताफ्यावर फेकल्या चपल्या, बांगड्या, बाटल्या अन काळे झेंडे

भाजपाने पाच वर्षात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णानगर येथील उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी निदर्शने करत भाजपचा निषेध केला.

सकाळ वृत्तसेवा

भाजपाने पाच वर्षात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णानगर येथील उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी निदर्शने करत भाजपचा निषेध केला.

पिंपरी - भाजपाने (BJP) पाच वर्षात भ्रष्टाचार (Corruption) केल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri CHinchwad City) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पूर्णानगर येथील उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी निदर्शने करत भाजपचा निषेध (Protest) केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ताफ्यावर चपल्या, बांगड्या, पाण्याच्या बाटल्या आणि काळे झेंडे (Black Flag) फेकले. दरम्यान, आंदोलकांना (Agitation) मागे हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. काही जणांना ताब्यात घेतले.

महापालिकेने शहरात उभारलेल्या विविध विकासकामांची उद्घाटने रविवारी (ता. ६ ) फडणवीस यांच्या हस्ते झाली. पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोल झाले. प्रवेशद्वारापासून काही अंतरावर आंदोलनकर्त्यांना अडविण्यात आले होते. तरीही घोषणाबाजी करीत जमाव पुढे सरकत होता. तर प्रवेशद्वारावर उभे असलेले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्तेही पुढे सरसावले. दरम्यान, प्रवेशद्वाराकडे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अडविताना पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

थोड्या वेळातच फडणवीस यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ताफ्यातील वाहनांवर चपल्या, बांगड्या, पाण्याच्या बाटल्या आणि काळे झेंडे फेकले. उद्यानात उद्घाटन सुरू असताना व फडणवीस यांचे भाषण सुरू असताना बाहेर आंदोलनकांची भाजपविरोधी घोषणाबाजी सुरू होती. ‘गली गली मी शोर है, भाजपवाले चोर है’, ‘गोरगरिबो को कष्ट है, भाजपवाले भ्रष्ट है’, ‘चले जाओ, भ्रष्टाचारी भाजप चले जाओ’, ‘फडणवीस गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. हातात निषेधाचे फलक, काळे झेंडे व डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT