पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोरोनामुळे नगरसेवकांना असाही बसला फटका...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर इच्छुक असलेल्या नगरसेवकांचा कोरोनामुळे घात झाला आहे. कारण, सोमवारी विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक या समित्यांची एक वर्षाची मुदत संपली. परंतु, यापूर्वीच नवीन सदस्यांची निवड व्हायला हवी होती. मात्र, पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांवर नवीन नियुक्त्या न करण्याचा राज्य सरकारचा सर्वसाधारण सभेला आदेश असल्याने अनेक इच्छुक नगरसेवकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले. एका समितीत नऊ याप्रमाणे चार समित्यांवर ३६ नगरसेवकांना संधी मिळाली असती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती, शिक्षण समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती आणि  कला, क्रीडा, सांस्कृतिक समिती कार्यरत आहेत. आता विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती आणि  कला, क्रीडा, सांस्कृतिक समिती या चार विषय समित्यांचा कार्यकाळ संपला आहे. राज्य सरकारने समितीच्या अध्यक्षांना मुदतवाढ द्यावी असे म्हटले आहे. परंतु, या चारही समित्यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षांनाही मुदतवाढ देता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चारही समित्यांच्या अध्यक्षांची वाहने नगरसचिव विभागाने काढून घेतली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती आणि  कला, क्रीडा, सांस्कृतिक समित्यांचे अधिकार आता सर्वसाधारण सभेकडे आले आहेत. राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत महासभेला विषय समित्या गठित करता येणार नाहीत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या केवळ स्थायी समिती व शिक्षण समितीच कार्यरत आहे. शिक्षण समितीची मुदत सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. स्थायी समितीवर नवीन आठ सदस्यांसह अध्यक्षांची निवड फेब्रुवारी महिन्यात झाली आहे. बरखास्त झालेल्या प्रत्येक विषय समितीवर महापालिका संख्या बळानुसार भाजपचे सहा, राष्ट्रवादी दोन व शिवसेना एक अशा नगरसेवकांना संधी मिळाली असती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महापालिका नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, महापालिका विधी समिती, शहर सुधारणा समिती, महिला व बालकल्याण समिती आणि  कला, क्रीडा, सांस्कृतिक समितीची एक वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे या समित्या बरखास्त झाल्या आहेत. समित्यांचे अधिकार सर्वसाधारण सभेला आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT