पिंपरी-चिंचवड

#LockDown : जुनी सांगवीत गरजूंना करताहेत अशी मदत...

रमेश मोरे

जुनी सांगवी : लॉकडाउन काळात कष्टकरी, घरकामगार व मध्यमवर्गीय यांची घालमेल होत आहे. काम बंद असल्याने जवळची पुंजी ही संपली आहे. त्यामुळे या गरजूंसाठी येथील सिझन सोशल ग्रुप वेल्फेअर ट्रस्टकडून जीवनावश्यक वस्तू पोचविण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

सिझन सोशल ग्रुपच्या वतीने परिसरात सेवाकार्य सुरू आहे. त्यात दोन हजार कुटुंबाना पुढील चाळीस दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू योग्य खबरदारी घेऊन घरपोच पुरवला जात आहे. अनेकांकडे रेशनकार्ड नाही. तर काही उद्योगनगरीत खासगी नोकरी करतात. अनेक जण घरकामगार आहेत. ते भाड्याने राहतात.  अशा गरजू नागरिकांना सिझन सोशल ग्रुपकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. 

'खबरदारी तुम्ही घ्या, जबाबदारी आम्ही घेतो', असे म्हणत तांदूळ, गहू, तेल, तिखट, दाळ, साबण, सॅनिटायझर, मास्क या वस्तू एका कुटूंबाला दिल्या जात आहेत. किमान चाळीस दिवस पुरेल एवढा पुरवठा केला जात आहे. सिझन सोशल ग्रुपचे पन्नास कार्यकर्ते शिफ्टमधे काम करीत आहेत. गरजूंच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. येथील संस्कृती लॉन्स येथे किमान दोन हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला. 

या बाबत वेल्फेअर ट्रस्टचे प्रशांत शितोळे म्हणाले, "लॉकडाउन काळात सांगवी परिसरातील कष्टकरी मध्यमवर्गीय कुणीही उपाशी राहू नये, यासाठी योग्य नियोजन करून गरजूंपर्यंत उत्तम दर्जाच्या वस्तू घरपोच पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT